बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'..हजारो युवक करणार प्रवेश.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 5, 2022

बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'..हजारो युवक करणार प्रवेश..

बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'..हजारो युवक करणार प्रवेश..
बारामती: - दि.7 रोजी बारामतीत भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं जंगी स्वागताची तयारी चालू असून चौकाचौकात स्वागताचे बोर्ड लावण्यात आले आले, तर भाजप चे मिशन बारामती
सध्या महाराष्ट्रात चर्चेत असून बारामती
लोकसभा मतदार संघ भाजप ने लक्ष
केला असून उद्या चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या उपस्थितीत बारामती,इंदापूर,दौंड, पुरंदर येथील जवळपास एक हजार युवकांचा भाजप मध्ये प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त
असून याबाबत सर्व तयारी झाली आहे...
देशात भाजप चे 400 हुन अधिक खासदार निवडून आणण्याचे लक्ष भाजप च्या वरिष्ठ कार्यकारिणीने ठेवले असून ज्या ठिकाणी 2019 मध्ये भाजप दुसऱ्या स्थानावर होते त्या ठिकाणी
भाजप पूर्ण ताकतीने लढणार आहे.यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर मतदार संघाचा समावेश आहे.. बारामती लोकसभा मतदार संघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो.गेली पन्नास वर्ष पवार गटाची
बारामतीवर सत्ता आहे.. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा गड उद्वस्त करण्याचा चंग बांधला असून उद्याचा तरुणाचा होणारा प्रवेश हा मतदानावर परिणाम कारक ठरणार असल्याचे
भाजप च्या गोटातून बोलले जातं आहे.अनेक संघटना, कला क्रीडा क्षेत्रातील तरुणाई भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त असल्याने पवार गटाला ही बातमी धडकी भरवणारी असल्याचे मानले जाते.दरम्यान या प्रवेशाबद्दल अंत्यत गुप्तता पाळण्यात आली असून राष्ट्रवादी गोटात याची तुसभर सुद्धा माहिती नाही.त्यामुळेच भाजप च्या वरिष्ठ पातळीवरून या प्रवेशाची सूत्र फिरवली गेली असून या पक्ष प्रवेशाचा सूत्रधार कोण आहे हे उद्या कार्यक्रम झाल्यावरच समजेल.व कार्यकर्त्यांनी केलेल्या आयोजनाची दखल घेत त्यांच्या कामाचा आढावा घेणार असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment