आली आहे. इंदापूर तालुक्यातील सरसेवाडी गावच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजलीय. अबुजर जब्बार
शेख असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.जमीन व्यवहाराच्या भांडणातून हा प्रकार घडला.वडिलांसोबत असलेल्या भांडणाचा वचपा त्याच्या निष्पाप मुलावर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरसेवाडी गावच्या हद्दीमध्ये चार वर्षांच्या अबुजरच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला. यात अबुजरचा मृत्यू झाला.इंदापरू पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हाचा गुन्हा दाखल करुन घेतला. तसंच आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या धक्कादायक प्रकाराचा घटनाक्रमाचा खुलासाही केला आहे.सरसेवाडी जाधव पाटी इथं राहणारे 36 वर्षीय जब्बार गफूर शेख यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार जयप्रकार नरहरी देवकाते याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला
होता.जयप्रकाश देवकाते याने जब्बार गफूर शेख यांच्या मुलगा अबुजर शेख (वय 4 वर्ष 2 महिने) याच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच 12 एफ 1248 होता. आधीच असलेल्या जमीन व्यवहाराच्या भांडणातून जयप्रकाश याने आपल्या मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याचा आरोप जब्बार यांनी केलाय.
अबुजरच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्यानं त्याला गंभीर जखम झाली होती. त्याच्या डोक्याला, तोंडाला आणि उजव्या कानाजवळ गंभीर मार बसला होता. गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, ट्रॅक्टर मुलाच्या अंगावर घातल्यानंतर जयप्रकाश ट्रॅक्टर शेतातच सोडून पळून गेला होता.इंदापूर पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे.सध्या त्याची कसून तौकशी केली जाते आहे. अटक करण्यात आलेला आरोपी शिवाजी चौक खडकपुरा इथं
सध्या राहायला आहे. तो मूळचा सरसेवाडी जाधव वस्तीतीलच असल्याचीही माहिती समोर आली आहे.याप्रकरणी पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment