मंडल अधिकाऱ्यासह तलाठी यांनी मागितली डंपर वर कारवाई न करण्यासाठीदीड लाखांची लाच.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 16, 2022

मंडल अधिकाऱ्यासह तलाठी यांनी मागितली डंपर वर कारवाई न करण्यासाठीदीड लाखांची लाच..

मंडल अधिकाऱ्यासह तलाठी यांनी मागितली डंपर वर कारवाई न करण्यासाठी दीड लाखांची लाच..
 
जळगाव:-लाचखोरीचे प्रमाण वाढत असताना मंडल अधिकारी व तलाठी यांचा आर्थिक देवाणघेवाण  वाढत असल्याचे बातम्या प्रसिद्ध होत आहे तर नोंदीसाठी सुद्धा लाच घेतल्याचे बातम्या प्रसिद्ध झालल्या असताना, नुकताच मंडलअधिकारी दिनेश शामराव सोनवणे, वय ४८रा. अमळनेर. आणि तलाठी गणेश राजाराम महाजन,वय - ४६ अमळनेर शहर, रा. नवीन बसस्टँड समोर, पाळधी,ता.धरणगाव यांना
डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात दीड लाखांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली.अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात तक्रारदार यांचा बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे.
तक्रारदार यांच्याकडे व्यवसायासाठी स्वतःच्या
मालकीचे ३ डंपर असून करारनामा तत्वावर विकत घेतलेले अजून तीन डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं. MH १८ AA ११५३ हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना मागील २ महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जप्त करण्यात आले होते. या डंपरवर कारवाई न करता डंपर सोडून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे गणेश राजाराम महाजन आणि दिनेश शामराव सोनवणे यांनी दोन लाखांची मागणी केली. नंतर तडजोडी अंती ही रक्कम दीड लाख देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीच्या अनुषंगाने तलाठी व मंडळ
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून
परिसरात या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment