दुय्यम निबंधक आणि खासगी व्यक्तीला अॅन्टी करप्शने वकिलाकडून 7 हजार रुपये लाच घेतानाजाळ्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 2, 2022

दुय्यम निबंधक आणि खासगी व्यक्तीला अॅन्टी करप्शने वकिलाकडून 7 हजार रुपये लाच घेतानाजाळ्यात..

दुय्यम निबंधक आणि खासगी व्यक्तीला अॅन्टी करप्शने वकिलाकडून 7 हजार रुपये लाच घेताना
जाळ्यात..                                                        रत्नागिरी :-दुय्यम निबंधक कार्यालयात आर्थिक देवाण घेवाण झाल्याशिवाय लवकर कामे होत नाही याची अनेक उदाहरणे आहेत, लाच लुचपत विभागाने अनेक कारवाई केल्या आहेत तर नुकताच पक्षकाराचे खरेदीखत व हक्क सोड नोंदणी करण्यासाठी 10
हजार रुपये लाच मागून 7 हजार रुपये लाच
स्विकारताना  चिपळूण दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक आणि एका
खासगी व्यक्तीला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून
रंगेहात पकडले. रत्नागिरी एसीबीच्या पथकाने ही कारवाई चिपळून दुय्यम निबंधक कार्यालयात बुधवारी (दि. 2) केली. दुय्यम निबंधक प्रशांत रघुनाथ धोत्रे (वय 43), खाजगी इसम अरविंद बबन पडवेकर (वय 56 रा. मूरादपूर ता.
चिपळूण जि.रत्नागिरी) असे लाच घेताना रंगेहात
पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत 34
वर्षाच्या वकीलांनी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली
आहे.तक्रारदार हे व्यावसायाने वकील आहेत त्यांच्या पक्षकाराचे खरेदीखत व हक्क सोड नोंदणी करण्यासाठी प्रशांत धोत्रे यांनी 10 रुपये लाच मागीतली होती. याबाबत तक्रारदार यांनी रत्नागिरी एसीबीकडे तक्रार दिली. पथकाने बुधवारी पचासमक्ष पडताळणी केली असता धोत्रे यांनी दस्त नोंदणीचे 4500 आणि यापूर्वी केलेल्या दस्त नोंदणीचे राऊंड फिगर लाचेची मागणी केली.तसेच तडजोडी अंती 7 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले.लाचेची रक्कम खासगी व्यक्ती अरविंद पडवेकर याने प्रशांत धोत्रे यांच्या सांगण्यावरुन दुय्यम निबंधक कार्यालयात स्विकारली.लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर पथकाने पडवेकर याला रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उप अधीक्षक सुशांत चव्हाण पोलीस निरीक्षक अनंत कांबळे पोलीस अंमलदार संतोष कोळेकर, दिपक आंबेकर,हेमंत पवार, चालक पोलीस शिपाई प्रशांत कांबळे यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment