चक्क..न्यायालयाची फसवणूक,पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या खुनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 1, 2022

चक्क..न्यायालयाची फसवणूक,पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या खुनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे...

चक्क..न्यायालयाची फसवणूक,पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या खुनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे...
 पुणे :-बनावट कागदपत्रे तयार करून कशीफसवणूक केली याबाबत नुकताच मिळालेली माहिती अशी की, खूनाचा गुन्हा आणि
दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे तयार करुन ती शिवाजीनगर येथील न्यायालयात सादर करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न
समोर आला आहे.याप्रकरणी फौजदारी न्यायालय क्रमांक ४ चे सहायक अधीक्षक विनायक जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६७/२२)दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतिक बाळासाहेब
वाळके (रा. चिखली), समाधान पांडुरंग सोनार (वय २८, रा. कोथरुड आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात २० ऑक्टोबर रोजी घडला होता विश्रामबाग पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ओकांरेश्वर मंदिराच्या मागील बाजूला दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले होते. त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा माल व दरोड्याचे साहित्य जप्त केले होते. हे सर्व जण आंध्र प्रदेशातील नेल्लुर जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यातील फिलीप नागराज समुद्रला याच्या जामिनाकरीता बनावट कागदपत्रे तयार
करण्यात आली.निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी रघुनाथ खैरे यांचे पुत्र नरेंद्र खैरे (वय ३३) यांच्याबरोबर पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरुन २६ जून रोजी रात्री वाद झाला होता.तेव्हा टोळक्याने त्यांना मारहाण करुन त्यांचा खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी इतरांबरोबर रमेश इंद्रसिंग परीवार याला अटक केली होती. त्याच्या जामिनाकरीता त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसतानाही आरोपींनी हवेली तालुक्यातील  चिखली येथे जमीन असल्याची बनावट कागदपत्रे व ७/१२ चा उतारा तयार करुन तो न्यायालयात सादर केला.न्यायालयाची फसवणूक केल्याचे समोर असल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून
सहायक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास
करीत आहेत.

No comments:

Post a Comment