बापरे.. बारामती दहशतीखाली,शहर आणि एमआयडीसीत तलवारी,कोयता दाखवत दहशत करून केली तोडफोड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 17, 2022

बापरे.. बारामती दहशतीखाली,शहर आणि एमआयडीसीत तलवारी,कोयता दाखवत दहशत करून केली तोडफोड...

बापरे.. बारामती दहशतीखाली,शहर आणि
एमआयडीसीत तलवारी,कोयता दाखवत दहशत करून केली तोडफोड...                                   बारामती : - बारामती शहरासह टी. सी. कॉलेज, पाटस रोड,एमआयडीसी परिसरात अज्ञात
गुंडांनी तलवारी,कोयता दाखवत दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. बारामती शहरातील सराफ पेट्रोलपंप,टी सी कॉलेज आणि एमआयडीसीत तीन ते चार ठिकाणी तलवारी व कोयत्याचा धाक दाखवून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये
भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसां पुढे एक आवाहन निर्माण झाले आहे.बारामतीत आज सायंकाळच्या सुमारास अज्ञात गुंडांनी तलवारी व कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती
शहरातील सराफ पेट्रोलपंप, टी.सी. कॉलेज आणि एमआयडीसी परिसरात तलवारी व कोयत्याचा धाक दाखवत तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे.दुचाकीवरून आलेल्या या गुंडांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तलवारी व कोयत्याचा धाक दाखवत तोडफोड करण्यासह पाटस रस्त्यावर एकावर वार केल्याची माहिती मिळत आहे.बारामती हे सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात असताना मागील काही महिन्यांत कोयत्याने खून, गोळीबार असे अनेक घटना घडल्या यामुळे आधीच दहशतीखाली असणारी बारामती मात्र आजच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही घटना पाहता बारामतीत वाढत असलेल्या गुन्हेगारीवर पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यातूनच आजचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पोलिस यंत्रणेकडून गुन्हेगारीबाबत योग्य उपाय योजनांसह ठोस पावले उचलण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.एकीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह
नागरिकांना सुरक्षितपणे राहता यावे यासाठी प्रयत्न करीत असतात. अशातच बारामतीत धक्कादायक आणि नागरिकांमध्ये भीती वाढवणारी घटना समोर आली आहे. बारामतीत आजवर कधीही अशा घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे आता या घटनेबाबत अजितदादा काय निर्णय घेतात याकडेच आता लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment