*संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती साजरी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 5, 2023

*संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती साजरी*

*संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती साजरी*

 बारामती: - पंधराव्या शतकातील महान क्रांतिकारक, जातीव्यवस्था नष्ट करून सर्व मानव समाजाला एकसूत्रतेत बांधून ठेवणारे मानवतावादी जगतगुरू संत शिरोमणी गुरू रोहिदास महाराज यांची 646 वी जयंती येथील समाज मंदिरात पूजा व आरतीने संपन्न झाली.
     सदर आरती व पूजा बारामती नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा विद्या प्रतिष्ठान चे संचालक किरण गुजर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सर्वश्री महेश अगवणे, नागेश लोंढे, प्रल्हाद दुर्गे, हनुमंत माने, पी. एस. कांबळे, अमोल सोनवणे यांच्यासह हराळे वैष्णव बारामती तालुका संघटनेचे पदाधिकारी व समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था केली होती.
     तसेच शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी या नवीन बांधलेल्या समाज मंदिरात संत रविदास महाराज यांच्या नुकत्याच आणलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व विधिवत पूजा करून स्थपना करण्यात येणार असून सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हराळे वैष्णव संघटना बारामती तालुक्याचे अध्यक्ष नितीन सुभाष अगवणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment