बारामती मध्ये शीघ्र कृती दलाचे संचलन.. बारामती:- बारामती मध्ये शीघ्र कृती दलाचे संचलन आगामी काळात सण उत्सव मिरवणुका व पुढील वर्षी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने संवेदनशील शहरांमध्ये कोणत्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून टॉपोग्राफीचा अभ्यास व्हावा व एरिया डॉमिनेशन साठी शीघ्र कृती दल हे महत्त्वाच्या शहरांमध्ये पथसंचलन करत असते
त्या अनुषंगाने जलद कृती दलाचे समादेशक संतोषी सहाय्यक समादेशक स्वाती तांदळे पोलीस निरीक्षक पवन कुमार यांनी बारामतीतील संवेदनशील मार्केट श्रीराम नगर आमराई कसबा खंडोबा नगर व वसंतनगर या भागात पतसंचलन दुपारी केले मिरवणुकीचे मार्ग संवेदनशील ठिकाणे धार्मिक स्थळ यांचा बारकाईने अभ्यास करून नकाशा तयार करण्यात आला. तसेच त्यांची गोपनीय यंत्रणा सुद्धा कार्यान्वित केली सदर संचलना सोबत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर युवराज घोडके पोलीस हवालदार यशवंत पवार कोकणी अतुल जाधव कल्याण खांडेकर ठोंबरे हे सुद्धा पथसंचलनावेळी हजर होते हजर होते.
त्यांनी जमावा हटवण्याच्या सर्व सामग्रींसह पतसंचलन केले त्यामध्ये अतिशय आणीबाणीच्या वेळी वापरण्यात येणारी स्वयंचलित हत्यारे यांचा सुद्धा समावेश होता.
No comments:
Post a Comment