शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामुळे झाले चिमुकल्या बाळाचे ऑपरेशन.. बारामती:- रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब व मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख आदरणीय श्री मंगेश जी चिवटे व श्री राजेभाऊ जी भिलारे पुणे जिल्हा उपशहर प्रमुख व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रचार प्रमुख व सह कक्ष प्रमुख आदरणीय श्री लक्ष्मण जी सुरवसे, श्रीयुत रामहरी सह कक्ष प्रमुख व आदरणीय माऊली धुळगुंडे या वरील सर्व मान्यवरांच्या कृपाशीर्वादाने वरील फोटो मधल्या अवघ्या बाळाचे नाव बेबी स्वप्निल सोनवणे राहणार पणदरे तालुका बारामती जिल्हा पुणे तीन ते पाच दिवसाचे जन्मताच अन्ननलिका नसल्यामुळे त्यांचे तातडीने ऑपरेशन चिरायु
हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचा सल्ला तेथील तज्ञ डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना दिला व हे ऑपरेशन खूप महागडे असल्याकारणाने ते त्या मुलांच्या नातेवाईकांना शक्य नव्हते परंतु देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे त्यांनी लागलेच वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक श्री सतीश महादेव गावडे लिमटेक तालुका बारामती जिल्हा पुणे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे बारामती तालुका समन्वयक श्री मंगेश जी खताळ, श्री अनिल कदम व कृष्णा जगताप यांना त्या बाळाच्या खर्चाबाबत सविस्तर कल्पना दिली वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी पेशंटच्या नातेवाईकांना व डॉक्टरांना अतिशय मोलाचा सल्ला दिला की आपण तातडीने त्या चिमुकल्या बाळाची ऑपरेशन करण्याची तयारी करा पैशाचे आपण बिलकुल काळजी करू नका लागली चिरायु हॉस्पिटल मधील मुख्य डॉ दोभाडा, श्री डॉ संकेत नाळे,श्री डॉ अमित कोकरे, डॉ. श्री तात्यासाहेब कोकरे, डॉक्टर श्री श्रीयुत, डॉक्टर नितीन पळसे, डॉ श्री गणेश, श्री नामे, डॉ श्री शशांक शहा भुलतज्ञ वरील सर्व डॉक्टरांनी एकत्रित येऊन चिरायु हॉस्पिटल मध्ये त्या लहानग्या चिमुकल्या बाळा वरती यशस्वीरित्या सर्जरी केली आज 20.2.2023 रोजी बाळाला डिस्चार्ज मिळाला त्यावेळेस हॉस्पिटल मधील बाळाचे एकूण खर्च 2 लाख 45हजार दोनशे रुपये खर्च झालेला असून त्यामधील पेशंटच्या नातेवाईकांनी 96 हजार सहाशे रुपये भरले असता उरलेल्या रकमेपैकी बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वरील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य कक्ष प्रमुख श्री मंगेशजी चिवटे यांना लागलीस फोन केला असता आदरणीय श्री मंगेश सरांनी तेथील मुख्य डॉक्टरांना त्या लहानग्या बाळासाठी जास्तीत जास्त उरलेल्या रकमेमध्ये मदत मिळावी अशी फोनवरून प्रत्यक्ष विनंती केली व शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे श्री सतीश गावडे यांनी त्या पेशंटसाठी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी फोनवरून मुख्यमंत्री कक्ष कार्यालयात श्री राम हरी व श्री माऊली धुळगुंडे व श्री लक्ष्मण जी सुरवसे यांच्याशी त्या चिमुकल्या बाळासाठी फोन द्वारे संपर्क केला असता त्यांनी लागलीच डॉक्टर श्रीकांत फाउंडेशनचे श्री आदरणीय श्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहीचे त्या बाळासाठी लेखी पत्र साहेबांचे तेथील मुख्य डॉक्टरांना दाखविले असता उरलेल्या बिलामध्ये त्यांनी जवळजवळ 50 हजार रुपये बिल कमी केले त्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी आदरणीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व वरील सर्वांचे व बारामती येथील चिरायु हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टरांचे व सर्व कामगारांचे आणि बारामती मधील वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व टीमचे खूप खूप आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment