चक्रावून टाकणारी घटना..बलात्कार होत असताना स्वतःच केले व्हिडिओ चित्रीकरण, बलात्कार पीडितेच्या दावा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 13, 2023

चक्रावून टाकणारी घटना..बलात्कार होत असताना स्वतःच केले व्हिडिओ चित्रीकरण, बलात्कार पीडितेच्या दावा..

चक्रावून टाकणारी घटना..बलात्कार होत असताना स्वतःच केले व्हिडिओ चित्रीकरण, बलात्कार पीडितेच्या दावा..
ग्वाल्हेर:-नुकताच एक चक्रावून टाकणारी घटना घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की, बलात्कार होत असताना त्याचे चित्रिकरण मी स्वतः केले आहे, असा दावा पीडितेने न्यायालयात
केला. या दाव्यामुळे न्यायालयही चक्रावून गेले. ते
चित्रिकरण महाअधिवक्त्याने बघावे.पीडितेच्या दाव्यात तथ्य आहे का हे तपासून न्यायालयाला सांगावे, असे आदेश देत न्यायालयाने ही
सुनावणी तहकूब केली.ग्वाल्हेर उच्च न्यायालयात सोमवारी ही सुनावणी झाली.त्या पीडितेवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीने जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणीत आरोपीकडून ऍड संगीता पचौरी यांनी युक्तिवाद केला.आरोपीने पीडितेच्या पतीला पैसे दिले होते. ते पैसे तो परत मागत होता. त्यावेळी पीडितेने आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. विशेष म्हणजे घटनेच्या ३६ दिवसांनी पीडितेने तक्रार दाखले केली. तिचा जबाब नोंदवण्यात आला.बलात्कार झाला तेव्हा मी स्वतः अतिप्रसंगाचे चित्रिकरण केले असे पीडितेने जबाब नोंदवताना पोलिसांना सांगितले. मात्र पीडिता स्वतः घटनेचे चित्रिकरण कसे करु शकते, असा सवाल ऍड पचौरी यांनी केला.त्यावर न्यायालयानेही आश्चर्य व्यक्त केले. घटनेचे पीडिता स्वतः चित्रिकरण कसे करु शकते, असा प्रश्न
न्यायालयालाही पडला. अखेर न्यायालयाने या
चित्रिकरणाची सत्यता तपासण्याचे आदेश
महाधिवक्त्यांना दिले. महाधिवक्त्याने हे चित्रिकरण बघावे. चित्रिकरण बघून पीडितेचा दावा खरा आहे की खोटा हे महाधिवक्त्याने न्यायालयाला सांगावे, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.ही घटना गेल्या वर्षी घडली. १६ डिसेंबर २०२२ रोजी पीडितेने आरोपी जितेंद्र बघेल विरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडिता विवाहीत आहे. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बघेल विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली.तुरुंगात असाताना बघेलने स्थानिक न्यायालयात
जामीनासाठी अर्ज केला होता. स्थानिक न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे बघेलने जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावरील सुनावणीत पीडितेने केलेल्या दाव्याने न्यायालयालाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे न्यायालयाने  पीडितेच्या चित्रिकरणाचे सत्य तपासण्याचे आदेश महाधिवक्त्यांना दिले आहेत. हा बलात्कार आहे की सहमतीने केलेले कृत्य हेदेखील महाधिवक्त्याने तपासावे असेही न्यायालयाने सांगितले आहे.

No comments:

Post a Comment