सिंधुदुर्ग येथे राज्य पत्रकार संघाचा विविध उपक्रम पुरस्कार सोहळा.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 21, 2023

सिंधुदुर्ग येथे राज्य पत्रकार संघाचा विविध उपक्रम पुरस्कार सोहळा.!

सिंधुदुर्ग येथे राज्य पत्रकार संघाचा विविध उपक्रम पुरस्कार सोहळा.!                                 वारीसे पत्रकाराच्या कुटुंबीयांना पत्रकार संघाचा आर्थिक मदतीचा हात..!
 सिंधुदुर्ग(प्रतिनिधी):-चांदा ते बांदा या उक्तीप्रमाणे संघटनेचे काम करत असताना संपूर्ण राज्यभरामध्ये गोवा दिल्ली बेळगाव गुजरात महाराष्ट्र राज्य मध्ये या संघटनेचे कामकाज चालू असताना पत्रकारांच्या सुखदुःखासाठी या संघटनेने आतापर्यंत आपले काम केले असून राज्य सरकारने कोरोना काळात पत्रकारांना विमा कवच दिले जाईल असे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही मात्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कोरोना काळामध्ये मयत झालेल्या पत्रकारांना आर्थिक मदत देण्यात आली कोरोना काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून किराणा व इतर साहित्य वाटप करण्यात आले तर महाड चिपळूण ठाणे खेड  येथे आपत्ती आली त्यावेळेस  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार  संघाच्या वतीने पाच ते सहा ट्रक किराणा व साहित्य वितरण करण्यात आले .असे मत डॉ विश्वासराव आरोटे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर व गोवा राज्यातील  सरहद्दीवरील बांदा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले तर यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  प्रांरभ झाला पत्रकार वारसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक प पु महंत मठधिश सद्गुरू गावडे महाराज होते व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते नामवंत उद्योजक विशाल परब. सरपंच प्रियंका नाईक. सेवानिवृत्त सैनिक शंकर भाईप. आरोग्य अधिकारी डॉ जगदीश पाटील.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभाग संपर्कप्रमुख बाजीराव फराकटे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर.... जेष्ठ पत्रकार कृष्णा सावंत सचिव शिरीष नाईक.उपाध्यक्ष समील जळवी.सुनील आरोटे मनोहर हिंगणे यांसह अनेक ज्येष्ठ पत्रकार व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..तर आरोटे यांनी पुढे बोलताना सांगितले की .हे सर्व काम करत असताना या भागातील पत्रकार वारीसे यांच्यावर जो मृत्यू झाला त्या कुटुंबाला राज्य पत्रकार संघाच्या वतीने व ऑल इंडिया जर्नलिस्ट या संघटनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना देखील राज्य पत्रकार संघ नेहमी मदत करेल आज या ठिकाणी ज्या पत्रकारांनी आपली पत्रकारिता करत असताना समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून अनेकांना उभारी देण्याचे काम केले आहे त्या सर्वांना पुरस्कार देऊन एक प्रकारे त्यांच्या कामाची उमेद वाढवली आहे भविष्यकाळात देखील कोकण भागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागात देखील या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करावे त्यासाठी राज्य पत्रकार संघातून सर्व सहकार्य केले जाईल पत्रकारांनी देखील आपल्या लिखाणातून कोणाचे जीवन उध्वस्त होणार नाही यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या राज्य पत्रकार संघाच्या वतीने 365 दिवस आपण विविध उपक्रम राबवत असतो हे उपक्रम राबवत असताना आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही विधानसभावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे ही भावना प्रत्येकाने मध्ये झाली तर नक्कीच हा समाज आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही चांदा ते बांदा ही प्रत्येक पक्षाचा नारा असतो त्याप्रमाणे राज्य मराठी पत्रकार संघाने देखील चांदा ते बांदा याप्रमाणे आज बांद्यामध्ये जो कार्यक्रम घेतला समाजामध्ये अनेक जण काम करत असतात अशा उपेक्षित कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना उभे राहण्याचे कार्य राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून नक्कीच केले आहे कोकण विभागातील या तीन जिल्ह्यांमध्ये प्रथमपासूनच राज्य पत्रकार संघाने सर्वाधिक मदत केली आहे ही मदत करत असताना पत्रकार देखील एक समाजसेवक काही पत्रकारांनी देखील लिखाणाच्या माध्यमातून राज्य सरकारला मोठे सहकार्य केले आहे मात्र राज्य सरकार पत्रकारांकडे नेहमी दुर्लक्ष करते चौथा स्तंभ आहे मात्र हा चौथा स्तंभ दळमळीत करण्याचे काम राज्यकर्त्यांकडून नक्कीच होत आहे केंद्र व राज्य सरकारने आता पत्रकारांसाठी प्रत्येक अर्थसंकल्पात वेगळे बजेट केले पाहिजे ग्रामीण भागातील पत्रकार हा पत्रकारिता करत असताना असंख्य समस्येला सामोरे जात आहे पत्रकार संरक्षण कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही होत नाही ग्रामीण भागातील जनतेच्या व्यथा शासन दरबारी मांडण्याचे मोठे काम केले आहे आजही बाळशास्त्री जांभेकर यांचा जिल्हा हा सिंधुदुर्ग असून याच भागातील पत्रकारांवर जीवे मारण्याचा प्रकार झाला अनेकांचा जीव गेला मात्र राज्य सरकारने अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी राज्यातील सर्व पत्रकार संघांनी केली राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात नव्हे तर गोवा दिल्ली बेळगाव गुजरात या राज्यात देखील आंदोलन करत या आंदोलनाची दखल या सरकारला घ्यावी लागली त्यामुळे प्रत्येक पत्रकार व सभासदांनी संघटनेमध्ये काम करत असताना आपण आपल्या कामावर जेवढे प्रेम करतो तेवढे संघटनेवर प्रेम करून आपणच आपले संरक्षण करू शकतो अशी आव्हान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यसरजी डॉक्टर विश्वास आरोटे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी या भागातील पत्रकारांना मिठाई वाटून कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment