आरटीओ कार्यालयातील मनमानी कारभाराविरोधात केलेल्या उपोषणला कारवाईचे आश्वासन तर पुणे येथे आंदोलन संबंधित दिले निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 28, 2023

आरटीओ कार्यालयातील मनमानी कारभाराविरोधात केलेल्या उपोषणला कारवाईचे आश्वासन तर पुणे येथे आंदोलन संबंधित दिले निवेदन..

आरटीओ कार्यालयातील मनमानी कारभाराविरोधात केलेल्या उपोषणला कारवाईचे आश्वासन तर पुणे येथे आंदोलन संबंधित दिले निवेदन..                                                         पुुणे/बारामती:- बहुउद्देशिय वाहतुक चालक मालक संघटना, म. राज्य, तर्फे संतोष जाधव(पत्रकार)ब,उ,चालक/ मालक संघटना उपाध्यक्ष, सुनिल खेडेकर संघटना सचिव,शिवाजीराव  गव्हाणे. सह.कार्यवाहक,गौतम कांबळे, गौरव काळभोर व श्रीकांत  येळेकर सदस्य शिवाजी भाउसाहेब
गव्हाणे. रा: दौड, जि. पुणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, बारामती व इतर तालुक्यातुन होणारी ओव्हरलोड ची अवैध् वाहतुक यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे,
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथुन अवैध् पैसे घेवुन वाहने ओव्हरलोड करण्यास परवानगी दिली जाते. यामध्ये आर.टी.ओ अधिकारी बारामती, पिंपरी चिंचवड तसेच इतर
ठिकाणावरील जे कुणी असतील ते सांकेतिक शब्द "कार्ड” च्या माध्यमातुन प्रतिगाडी ३ ते
साडेतीन हजार रुपये घेतात. आणि गाडी ओव्हरलोड करण्यास परवानगी देतात.त्याची माहीती घेऊन मोठ्या प्रमाणात गाडी ओव्हरलोड केलेली असेल, अशा वाहनावरती  नजर ठेवली जाईल व कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले तर  फक्त १ ते २ टक्के कारवाई आर.टी.ओ अधीकारी यांच्यावर केली
जाते. कारण यांचे पैसे घेण्याची पध्दत ही एजंट कडुन आहे एजंट यांच्यावर कारवाई करुन संबंधीत अधिकारी याच्यावरती योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात यावी ही तसेच निवेदनाव्दारे आम्ही आपणांस कळवु इच्छितो की, चाललेला हा मनमानीचा गैरप्रकार यामध्ये दळणाबरोबर खडेही रगडल्या जावुन काही गरिब आणि हातावर पोट असलेल्या चालक आणि मालकांना या गोष्टीमुळे रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. आणि आपण जर लवकरात लवकर या प्रकरणामध्ये जर दखल घेतली नाही, तर भविष्यात हा चाललेला अंधारातील खेळ कित्येक लोकांच्या जिवावर उठल्याशिवाय राहणार नाही.
तसेच अजुन एक महत्वाची बाब म्हणजे  वास्तविक पाहता,याबाबत कोणतीही चौकशी होत नाही.केवळ इतकेच नव्हे तर पासिंग साठी जास्तीचे पैसे आकारले जातात याची देखील
कोणतीही चौकशी होत नाही, त्याबाबत देखील चौकशी करण्यात यावी. आणि उसाचे ट्रक
आणि ट्रॅक्टर ओव्हरलोड करतात यावर देखील कोणतीही चौकशी होत नाही आणि झालेली
नाही.आणि याबरोबरच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाडयामध्ये ओव्हर(ज्यादा) पॅसेंजर भरले जातात,आणि लगेच चे अवैध् वाहतुक केली जाते यावर देखील कोणतीही चौकशी अथवा कारवाई आजतागायत झालेली नाही.हा प्रकार  अतिशय खेदजनक आणि बेकायदेशिर असुन, सदर व्यवसायाच्या माध्यमातुन सदरील अधिकारी यांची महिन्याला लाखोंच्या घरात उलाढाल चालु आसल्याचे म्हंटले आहे. रक्कम एकत्र केल्यानंतर ती प्रत्येक पातळीवर वाटप केली जात असल्यामुळे या विरोधात कुणीही आपले तोंड उघडण्यास तयार नाही. परंतु आता हा प्रकार आमच्या नरडयाशी आला असल्यामुळे आम्हाला या प्रकाराबद्दल बोलणे भाग पडत आहे. आम्हाला याची पुर्ण कल्पना आहे की, हा प्रकार तुमच्या कानावर आल्यानंतर सदरील अधिकारी हा आम्हाला रडार वर घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु आमच्या अन्यायाविरुध्दच्या या उभारलेल्या लढयात आमचा जिव गेला तरी बेहत्तर, पण आमच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायातील आमच्या बांधवांची यातुन कायमची
मुक्तता करण्याचे आम्ही आता ठामपणे ठरवले आहे.वरील अधिकारी यांची आजपावेतो कधीही चौकशी झालेली नाही, तसेच याआधी
त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु या सर्वांमध्ये आमच्या सारख्या जनसामान्य
व्यावसायिकांचा जिव जात आहे, आणि खडयाबरोबर धान्यही रगडण्याचे काम या माध्यमातुन चालु आहे.तरी सदर पत्राव्दारे आपणांस कळकळीची विनंती करु इच्छितो की, सदरील अधिका-यावर आपण शक्य तितक्या लवकर योग्य ती कडक कायदेशिर कारवाई करावी,प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथील अजित शिंदे परिवहन अधिकारी यांना देण्यात आले असून कृपया नोंद घ्यावी.असे लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment