बेकायदेशीर गॅस रिफील सेंटरवर बारामती शहर पोलीसाचा छापा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 11, 2023

बेकायदेशीर गॅस रिफील सेंटरवर बारामती शहर पोलीसाचा छापा..

बेकायदेशीर गॅस रिफील  सेंटरवर बारामती शहर पोलीसाचा छापा..
बारामती:- बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास खबर लागली की सर्वे नंबर 856 अशोक नगर या ठिकाणी मुजीब गणीभाई बागवान राहणार अशोक नगर हा स्वतःच्या घराच्या बाजूला घरगुती वापरातील गॅस मशीनच्या साह्याने घरगुती वापराचा गॅस कमर्शिअल गॅस मध्ये तसेच गाड्यांमध्ये तसेच छोट्या छोट्या एक किलो दोन किलोच्या गॅस मध्ये भरून चढ्या भावाने विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी पुरवठा विभागाच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, शाहू, राणे, जामदार यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये छापा मारला त्या ठिकाणी लहान मोठ्या 57 गॅस सिलेंडरच्या टाक्या मिळून आल्या त्याची एकूण किंमत 74 हजार रुपये आहे तसेच त्या ठिकाणी गॅस ट्रान्सफर करणाऱ्या मोटरी व मशीन सुद्धा मिळून आल्या याप्रकारे धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग केला तर परिसरातील लोकांच्या जीवितास सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून भा द वी कलमाने सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणे सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे गनिभाई बागवान याला अटक करण्यात आली असून दोन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपी हा गॅस गजानन सुर्वे यांच्याकडून घेत असल्याचे सांगितले आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचे गॅस कोणत्या गॅस एजन्सीतून येत होते याबाबत सुद्धा सखोल चौकशी करण्यात येत आहे,सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली.

No comments:

Post a Comment