बारामतीत रंगणार कारभारी प्रिमिअर लिगचे ट्वेंटी 20 सामने.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 8, 2023

बारामतीत रंगणार कारभारी प्रिमिअर लिगचे ट्वेंटी 20 सामने..

बारामतीत रंगणार कारभारी प्रिमिअर लिगचे ट्वेंटी 20 सामने.....

बारामती, ता. 6 :- विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर व तालुका क्रिकेट संघटनेच्या वतीने ट्वेंटी 20 कारभारी प्रिमिअर लिग 2023 सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या लिगचे प्रमुख प्रशांत नाना सातव यांनी या बाबत माहिती दिली. 

येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर 20 ते 29 एप्रिल दरम्यान हे सामने खेळविले जाणार आहेत. लेदर बॉलवर होणा-या या सामन्यांसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना ग्रामीण भागात क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हावा या साठी अधिकाधिक सामन्यांचे आयोजन करण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. त्या दृष्टीने रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोठ्या प्रिमिअर लिगचे आयोजन केल्याचे प्रशांत सातव यांनी नमूद केले. 

दरम्यान या लिगमध्ये सर्वोत्तम खेळ करणा-या खेळाडूंचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत सहभाग असावा व या स्पर्धेला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची मान्यता मिळावी याचे निवेदनही रोहित पवार यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. फक्त बारामती तालुक्यातील खेळाडूच या लिगसाठी पात्र ठरणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रशांत नाना सातव 9604224242 किंवा सचिन माने 9096831183 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment