राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढणार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 26, 2023

राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढणार...

राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढणार...                        इंदापूर:-  सध्या निवडणूक कार्यक्रम चालू असलेल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोपने यांनी दिली ते पुढे म्हणाले की गत दोन बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने सक्रिय सहभाग घेऊन निवडणूक लढवली होती 2010 मधील निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल उभा करून पक्षाने अस्तित्व दाखवले होते 2016 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांमुळे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचे दोन उमेदवार पडले होते त्या निवडणुकीमध्ये रासपणे आपले उपद्रव मूल्य सिद्ध केलेले आहे आणि आता सध्या चालू असलेल्या निवडणुकीमध्ये पूर्ण पॅनल ताकतीने निवडणूक लढवणार आहे आणि ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार आहे असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला , या बैठकीमध्ये सोमनाथ पांढरमिसे यांचे बारामती लोकसभा उपाध्यक्षपदी बजरंग वाघमोडे यांचे इंदापूर विधानसभा अध्यक्षपदी नवनाथ कोळेकर यांचे इंदापूर तालुका कार्याध्यक्षपदी अतुल शिंगाडे यांचे बारामती लोकसभा सोशल मीडिया अध्यक्ष पदी अविनाश मोहिते यांची इंदापूर तालुका सरचिटणीस पदी शहाजी भाले यांचे श्रीनिवास सातपुते यांचे इंदापूर तालुका प्रवक्ते पदी व इंदापूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आले सदर बैठकीला राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित कुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे पुणे जिल्हा प्रवक्ते एडवोकेट दिलीप धायगुडे,तालुका अध्यक्ष तानाजीराव मार्कड, तालुका संघटक तानाजी शिंगाडे, युवक तालुका अध्यक्ष आकाश पवार सोशल मीडिया अध्यक्ष गणेश हे गडकर, तात्याराम मार्कड, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष सागर देवकाते राजेंद्र देवकाते खोरोची गावचे उपसरपंच दिलीप हे गडकर सोशल मीडियाचे राज्य कार्यकारणी सदस्य ज्योतीराम गावडे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment