वर्चस्वासाठी दोन पदाधिकाऱ्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 4, 2023

वर्चस्वासाठी दोन पदाधिकाऱ्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारी..

वर्चस्वासाठी दोन पदाधिकाऱ्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारी..
                                                                 बारामती:- बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ सदाशिव बल्लाळ यांनी सचिन अरुण काकडे राहणार सिद्धार्थनगर याच्या विरोधात दिनांक 2/3/ 2023 रोजी सायंकाळी साडेआठ वाजता क्रीडा संकुलच्या समोर त्यांच्यावर दाखल असणारी केस मिटवून देत नाही म्हणून डोक्यात दगड घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे,तर सचिन अरुण काकडे यांनी नवनाथ सदाशिव बल्लाळ यांनी दादागिरी करून त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे अशी फिर्याद दिल्याने दोघांचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर योग्य ते प्रतिबंधक कारवाई करत असल्याचे बारामती शहर पोलीस स्टेशनमधून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment