जागतिक महिला दिन, पुणे ग्रामीण टपाल विभागात साजरा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 8, 2023

जागतिक महिला दिन, पुणे ग्रामीण टपाल विभागात साजरा...

जागतिक महिला दिन, पुणे ग्रामीण टपाल विभागात साजरा...
बारामती:- पुणे ग्रामीण टपाल विभागातील सर्व महिला कर्मचार्यांसाठी जागतिक महिला दिनानिमित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये पाककला स्पर्धा, संगीत खर्ची इत्यादी. तसेच डॉ. प्रज्ञा एरंडे यांचे दैनदिन
जीवनातील अहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असे श्री बी पी
एरंडे, अधीक्षक डाकघर पुणे ग्रामीण विभाग यांनी सांगितले.तसेच विशेष कामगिरी करण्याच्या महिलांचा व नुकत्याच गोवा(पणजी)येथे पार पडलेल्या आखिल भारतीय ३५ व्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र परिमंडळ ने सादर केलेल्या श्री प्रकाश गोडबोले लिखीत आणि दिग्दर्शित '
आ अब लौट चले या हिंदी नाटीकेला प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल श्रीमती रितिका
साळुंके (प्रमुख कलाकार), सहायक शाखा डाकपाल, रावेत शाखाडाकघर यांचे
सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास श्रीमती. रेखा भळघट,
श्रीमती सुनिता घाणेकर, श्री एस डी मोरे, सहायक अधीक्षक पुणे ग्रामीण विभाग,
श्री राहुल शित्रे, तक्रार निरीक्षक पुणे ग्रामीण विभाग इ. मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment