दोन नंबरचे पैसे डबल देतो असे सांगून फसवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 22, 2023

दोन नंबरचे पैसे डबल देतो असे सांगून फसवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई..

दोन नंबरचे पैसे डबल देतो असे सांगून फसवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई..
बारामती:- फसविण्याच्या अनेक युक्त्या मार्केटमध्ये आहेत. दररोज ऑनलाईन व ऑफलाईन वेगवेगळ्या प्रकारच्या झाकी देऊन  फसविणारे व फसवणारे अनेक किस्से आपण ऐकत असतो. त्यामध्येच कमी भावात सोने देतो. पुलिंग राईस. मॅजिक मनी. अशा वेगवेगळे श्रीमंत होण्याचे अमिश लोकांना दाखवून त्यांना विना कष्ट श्रीमंत करण्याबाबत पटवून देणारे ठग असतात. आणि त्याला बळी पडून फसणारे अनेक लोभी लोक सुद्धा असतात. फसणारा लोभापाई फसतो म्हणून तो अनेक वेळा तक्रारी करत नाहीत.दिनांक 18 मार्च रोजी व त्या अगोदर सांगली जिल्ह्यातील पलूस गावचे दिलीप ईश्वरा सावंत वय 67 वर्ष यांना एका इसमाने मोबाईलद्वारे बतावणी केली की. त्यांच्याकडे दोन नंबरचे लाखो रुपये आहेत. व तुम्ही जेवढे पैसे आणाल त्याच्या दुप्पट पैसे त्यांना देण्यात येतील. सदर पैसे काळ्या कोटिंग मधून तस्करीच्या स्वरूपात आलेले आहेत असे सांगितले. त्यांना अनेक वेळा फोनवरून पटवूनही देण्यात आले. त्यांचा मुलगा इंजिनियर असून बेकार आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळत असतील तर बेकार ही दूर होईल असे त्यांना वाटले. आणि ते  सापळ्यात अडकले. मग भामट्याने त्यांना बारामती याठिकाणी फलटण रोडवर बोलवले. त्यापूर्वी नातेपुते तसेच फलटण या ठिकाणी सुद्धा बोलवले परंतु त्या ठिकाणी त्याला भेट दिली नाही फिरवून फिरवून शेवटी फलटण रोड बारामती या ठिकाणी बोलावले. येताना फिर्यादी सोबत तीन लाख 95 हजार रुपये घेऊन आले. भामटा एका बॅगेमध्ये वह्या व दुसऱ्या बॅगेत नोटांचे बंडल घेऊन आला. सोबत आय टेन गाडी क्रमांक MH09 BB 4307 गाडी होती गाडीच्या डिक्की मध्ये रस्त्यातच दोन्ही बॅगा फिर्यादी यांना दाखवण्यात आल्या. आणि त्यांना सांगण्यात आले की यात लाखो रुपये आहेत तुम्ही जेवढे द्याल त्याच्या डबल देतो. असे सांगण्यात आले. फिर्यादी व आलेला भामटा एकमेकांना आजमावत होते. फिर्यादी याला  भामटा सांगत होता तू आणलेले पैसे त्याला दे लगेच तो दोन्ही बॅगा त्याला देईल फिर्यादी म्हणत होता खोलून बॅग दाखव व पैसे मोजून दे अशी त्यांची चर्चा चालू असताना. सदरची बातमी बारामती शहर पोलिसांना समजली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला. व कार सहित फिर्यादी फिर्यादीचा मुलगा त्याच्यासोबत आलेला आणखी एक इसम आरोपी असे सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले त्यांच्याकडे काय प्रकार आहे याबाबत सविस्तर चौकशी केली बॅग खोलून पाहण्यात आल्या त्यावेळी सदर बॅगमध्ये प्रथम दर्शनी नोटांचे बंडल दिसून आले परंतु बारकाईने पाहणी केली असता शंभर नोटांची पाचशे रुपये दराच्या नोटाची एक गड्डी व अशा एकत्र बांधलेल्या दहा ते बारा गड्डी चा एक गठ्ठा असे नोटांचे चार गठ्ठे व त्यावर एक ओरिजनल पाचशे रुपयाची नोट लावलेली व त्याखाली खेळणी येथील चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले परंतु हुबेहूब पाचशे रुपयांच्या नोटेसारखी दिसणाऱ्या नोटेची झेरॉक्स मारून फिर्यादीला नोटाचा बंडल दिसेल अशा पद्धतीने बांधलेले चार गट्टे मिळून आले. तसेच नोटेच्या आकाराच्या कापलेल्या काळ्या कागदाच्या पट्ट्या एका  पिशवीत मिळून आल्या व दुसऱ्या पिशवीमध्ये तिला कुलूप असलेले व त्यामध्ये शालेय वह्या  बाहेरून बागेमध्ये नोटा आहेत असे दाखवण्यासाठी ठेवलेल्या मिळून आल्या. आणि फिर्यादीकडे त्याने आणलेले तीन लाख 95 हजार रुपये मिळाले. यामध्ये फिर्यादीला त्याचे ओरिजनल पैसे काढून घेऊन तो लोभीपणाने दुप्पट पैशाच्या आशेने आला आहे त्याला नोटांची बनावट कागद देऊन त्याची लुबाडणूक करण्याचा उद्देश पोलीस चौकशीमध्ये दिसून आला. त्यामुळे आलेला भामटा प्रसाद संजय टकले वय 26 वर्ष राहणार प्रगती नगर शेळके वस्ती बारामती (तात्पुरत्या स्वरूपाचा ) व कायमचा पत्ता अहमदनगर याला पोलिसांनी अटक करून पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतलेली आहे. आरोपीच्या चौकशीत गौतम पाटील हा या फसवणुकी मागचा मास्टरमाइंड असल्याचे त्यांनी सांगितले आहे तो सुद्धा मोबाईल मधून आरोपीच्या संपर्कात होता परंतु पोलिसांनी सर्वांना पकडल्यामुळे तो त्या ठिकाणावरून पळून गेला. त्याचे नाव गौतम पाटील हे सुद्धा बनावट असावे असे एकंदरीत चौकशीतून दिसून आलेले आहे. बनावट सोने दाखवून देणार मॅजिक मनी दाखवून फसवणे पुलिंग राईस करून फसवणे अशा प्रकारे तो या भागातील लोकांना फसवत असतो असे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले आहे याप्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास व त्यांनी लाजकाज  पोलिसांना सांगितले नसल्यास पोलिसांची संपर्क साधावा.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक  अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक. तपास पथकाचे पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, संजय जाधव, तुषार चव्हाण, शाहू राणे, अशोक  जामदार, अक्षय सिताफ यांनी केलेली आहे.             वरील बातमीत दिलेले दोन फोटो मिळालेले आहेत हे दोघे मास्टरमाइंड आहेत यातील. यांना कोणी ओळखत असेल किंवा यांनी कोणाला ठरवलं असेल तर पोलीस स्टेशनशी संपर्क करावा.

No comments:

Post a Comment