*अबब.. पुलाचे बांधकाम चालु असतानाच ढासळले; लोकांचे प्राण वाचले?*
बारामती:- बारामती नगरपरिषद हाद्दीतील जळोची च्या स्मशानभूमी लगत बारामती जळोची रोडवरती पुलाचे बांधकाम चालु होते, सदरचे काम बांधकाम विभागाकडून संबधीत ठेकेदार करीत होता, परंतु या पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम चालु आहे या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी बांधकाम विभागाकडे वारंवार केली होती परंतु बांधकाम विभागाने संबंधीत ठेकेदाराला पाठीशी घालुन या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, आज या चालु असलेल्या पुलाचे बांधकाम मधेच ढासळले, येवढ्या निकृष्ट दर्जाचे काम संबंधीत ठेकेदार करत आहे, कदाचीत या पुलाचे बांधकाम पुर्ण झाल्यावर हा पुल ढासळला असता तर कितीतरी लोकांना प्राण गमवावे लागले असते,असे सातकर यांनी सांगीतले, आता पुन्हा या पुलाचे बांधकाम याच ठेकेदाराला दिले तर बांधकाम विभागाचे अधीकारी जाणुन बुजुन अशा चुकीच्या ठेकेदाराला पाठीशी घालतांना दिसत आहेत, तर बांधकाम विभागाने या ठेकेदाराकडून सदरचे काम काढुन घ्यावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाकडून बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे रासप चे तालुकाध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी सांगीतले.
No comments:
Post a Comment