श्री रेणुकादेवी विवाहसोहळा थाटामाटात संपन्न... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 6, 2023

श्री रेणुकादेवी विवाहसोहळा थाटामाटात संपन्न...

श्री रेणुकादेवी विवाहसोहळा थाटामाटात संपन्न...
बारामती:- श्री रेणुकादेवी देवस्थान रेणुकानगर, फलटण रोड, बारामती यांच्या वतीने आयोजित !!श्री रेणुकादेवी विवाहसोहळा !!सालाबादप्रमाणे झालेल्या श्री रेणुकादेवी विवाहसोहळा यंदा चैत्र पौर्णिमा गुरुवार दि ६/०४/२०२३ या दिवशी संपन्न झाला.या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,सकाळी ६ ते ९ वेळेस देवीस अभिषेक,सायं. ५ वा.श्री रेणुकादेवी हळदी कार्यक्रम,सायं. ७ वा.१५ मि.रेणुकादेवी विवाह सोहळा,सायं. ७ वा.३० मि.देवीची आरती,सायं. ७.३० ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो भक्तभाविकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविली.श्री रेणुका देवी ला फुलांची आरास करण्यात आला होता आलेल्या भाविकांना सुंदर फुलांची सजावटी केलेल्या श्री रेणुकादेवी चा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अश्या कार्यक्रमाचे आयोजन श्री. बाळासोा विश्वनाथ गायकवाड श्री रेणुकादेवी देवस्थान प्रमुख रेणुकानगर, फलटण रोड, बारामती व त्यांचे कुटुंबीयांनी केले होते.

No comments:

Post a Comment