ब्रेकिंग न्यूज..बारामती सहकारी बँकेच्या चौघांनी दिले राजीनामे,चर्चेला उधाण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 6, 2023

ब्रेकिंग न्यूज..बारामती सहकारी बँकेच्या चौघांनी दिले राजीनामे,चर्चेला उधाण..

ब्रेकिंग न्यूज..बारामती सहकारी बँकेच्या चौघांनी दिले राजीनामे,चर्चेला उधाण..
बारामती :-नुकताच बारामती सह बँकेच्या झालेल्या नफ्याची व वसुलीची बातमी आली असताना धक्कादायक बातमी आली की चार संचालक अध्यक्ष व उपाध्यक्ष सह यांनी राजीनामे दिले,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून
बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,
उपाध्यक्ष रोहित घनवट तसेच तज्ज्ञ संचालक
श्रीनिवास बहुळकर व प्रीतम पहाडे या चौघांनी
राजीनामे दिले आहेत.बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर बारामतीच्या राजकीय
वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अजित पवार यांनी हे राजीनामे का घेतले असावेत, त्यामागे काही कर्जदारांनी तक्रारी केल्या का?संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये झालेला गोंधळ त्याचा हा पडसाद आहे का?अशी शक्यता असेल अशी चर्चा बारामती तुन होताना दिसत आहे, अजित पवार यांच्या सूचनेवरूनच या चौघांनी
राजीनामे दिल्याची माहिती मिळतेय. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बारामती सहकारी बँकेने भरीव कामगिरी करत बँकेचा एनपीए लक्षणीयरीत्या खाली आणला व बँकेला यंदा चांगला नफा झाला आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या चार महत्त्वाच्या संचालकांचे राजीनामे अजित पवार यांनी घेतल्यानंतर आश्चर्य
व्यक्त केले जात आहे.बँकेने यंदा सात कोटी नव्वद लाखांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. बारामती सहकारी बँकेने ३१ मार्च अखेर ३६३२
कोटींचा एकूण व्यवसाय करत ५३. २९ कोटींचा
तरतूदीपूर्व ढोबळ नफा मिळविला आहे. आजवरच्या ढोबळ नफ्यात हा विक्रमी नफा आहे. सर्व तरतूदी पूर्ण करत बँकेने ७.९० कोटींचा निव्वळ नफा मिळविला.बँकेचे नक्त मुल्य १२८ कोटींवर पोहोचले आहे. बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसूली करून अनुत्पादक जिंदगी (एनपीए) चे प्रमाण कमी करण्यात यश
मिळविले असले तरी बारामती कर याबाबत प्रचंड नाराज असून कर्जदारांना झालेला नाहक त्रास, RBI च्या नियमाचा धाक दाखवून जामीनदारांचे खाते ब्लॉक करणे,कोणत्याही प्रकारे दयामाया न दाखवता केलेली पिळवणूक त्यामुळे निम्मी बारामती नाराज झाली असून येणाऱ्या निवडणुकीत याचा मोठा फटका बसणार असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले, अजितदादा आपण अहोरात्र कष्ट करून बारामतीचा विकास करताय पण बँकेच्या अश्या वागणुकीमुळे याचा परिणाम वेगळा दिसल्यास काय निर्णय घ्याल अश्या भावना व्यक्त होताना दिसत आहे,बारामती सह बँकेची खऱ्या अर्थाने निवडणूक व्हायलाच हवी होती पण दुर्दैवाने बळजबरीने बिनविरोध झाली हे संपूर्ण बारामती कराना माहीत आहेतच व त्यावेळी कशी निवडणूक प्रकिया राबवित असताना अधिकारी वर्ग कसे सहकार्य करीत होते हे समक्ष पाहिलं असून पुरावे देखील आहेच.त्यामुळे अजितदादा आपण लक्ष घालून बारामती करांची नाराजी दूर कराल हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहे.

No comments:

Post a Comment