अमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 5, 2023

अमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई...

अमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई...
कोंढवा:- अमली पदार्थ विरोधी पथक 2 ,कडील अधिकारी व कर्मचारी हे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहिती नुसार इसम नामे शाहिद शेख हा इसम राहणार इनाम नगर गल्ली कोंढवा पुणे येथे ब्राऊन शुगर / हेरॉईन हा अमली पदार्थ आपले ओळखीचा लोकांना विक्री करत आहे.
       त्यानुसार आमचे पथकाकडील  कडील अधिकारि व अमलदार असे सदर ठिकाणी जावून खात्री करून शाहिद अख्तरहुसेन शेख वय 49 राहणार सर्वे नंबर 48. इनाम नगर. कोंढवा. पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेली  एकूण 336.1 ग्रॅम. ब्राऊन शुगर उर्फ हेरॉईन 40.33.200/- रू की ची व 10.000/- विवो या कंपनीचा मोबाईल व रोख 1.600/-  असं एकूण 40.44.800/- असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  त्याचे विरुद्ध कोंढवा पो स्टे गु र न  ---/2023 एम.डी.पी.एस. कायदा कलम 8(क).21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यास पुढील कारवाई करीता कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे.
             सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे. अपर पोलिस आयुक्त. गुन्हे, श्री. अमोल झेंडे सो पोलिस उपआयुक्त गुन्हे, श्री. नारायण शिरगावकर सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे 2 यांचे मार्गदर्शनाखाली सुनील थोपटे, asi घुले. पोलिस हवालदार चेतन गायकवाड . मांढरे. कांबळे महिला पोलीस नाईक दिशा खेवळकर व बस्टेवड यांनी केली आहे अशी माहिती सुनील थोपटे,पोलिस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथक 2, गुन्हे शाखा,  पुणे शहर यांनी दिली.

No comments:

Post a Comment