*सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 14, 2023

*सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन*

*सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन*

     बारामती (प्रतिनिधी) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय बारामती (सिल्वर ज्युबली हॉस्पिटल ) येथे  उद्योजिका व हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मात्या सौ.रेश्मा साबळे यांचे वतीने वेंडिंग मशीन विनामूल्य बसविण्यात आले.
    यावेळी डॉ. सदानंद काळे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय बारामती यांच्या उपस्थितीत डॉ. सरदेसाई मॅडम वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन पार पडले डॉ. काळे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्सचे आभार मानले.
    या प्रसंगी श्रीमती केसकर सिस्टर इन्चार्ज, सिस्टर परिचारिका व रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांसह हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्सचे श्री.अक्षय साबळे. श्री भालचंद्र लोणकर, श्री. कैलास काकडे इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment