पोलीस दलात खळबळ.. आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू:पोलीस निरीक्षकावर कारवाई. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 12, 2023

पोलीस दलात खळबळ.. आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू:पोलीस निरीक्षकावर कारवाई.

पोलीस दलात खळबळ.. आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू:पोलीस निरीक्षकावर कारवाई.
                                                              बीड :पोलीस दलात खळबळ  उडाली याला कारण ठरले पोलीस कोठडीत एका
आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाच्या
पार्श्वभूमीवर आता थेट परळीतील एका पोलीस
निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी जबाबदार धरत पोलीस निरीक्षकाला सीआयडीच्या एका पथकाने आज परळीत येत ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सन 2014 मध्ये परळी पोलीसांनी अटक करुन पोलीस कोठडीत ठेवलेल्या आरोपीं पैकी एका आरोपीने गळफास घेतल्याने कोठडीतच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जबाबदार धरत तत्कालीन एक अधिकारी व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी होती.मयतांच्या नातेवाईकांनी केलेली होती. न्यायालयात हे प्रकरण सुरु असतांना सखोल चौकशी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक उमाकांत
कस्तुरे यांना जबाबदार धरत मनुष्यवधाचा गुन्हा
दाखल करण्यात आला. या प्रकरणात एक
पथक परळीत दाखल झाले. या पथकाने पोलीस
निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना ताब्यात घेऊन
न्यायालयात हजर केले आहे. अंबाजोगाई सत्र
न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली
आहे.

No comments:

Post a Comment