कोचिंग क्लासेस/अकॅडमी चालतात तर नक्की कोणाच्या जिवावर...? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 29, 2023

कोचिंग क्लासेस/अकॅडमी चालतात तर नक्की कोणाच्या जिवावर...?

कोचिंग क्लासेस/अकॅडमी चालतात तर नक्की कोणाच्या जिवावर...?                                          बारामती:- बेकायदेशीर बनावट कोचिंग क्लासेस/ अकॅडमी जे लाखोनी फीस घेतात व विद्यार्थी यांना ठरल्या प्रमाणे कुठल्याही प्रकारच्या सुविधा देत नाहीत...वरुन एक्स्ट्रा पैशांची मागणी करतात फीसाठी तगादा लावतात फी साठी विद्यार्थी होस्टेल मधून वर्गातून बाहेर काढतात. बारामतीच्या काही अकॅडमीच फायर ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट नाही उद्या जर काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण.  सदर खासगी कोचिंग क्लासेस/ अकॅडमी यांची बारामती पंचायत समिती बारामती,  नगरपरिषद बारामती यांच्या शिक्षण विभागा मध्ये नोंद नाही मग हे कोचिंग क्लासेस चालतात तर नक्की कोणाच्या जिवावर...? सदर कोचिंग क्लासेस/अकॅडमी हे सरळ सरळ आर टी ई act 2009 चे उल्लंघन करतात... यांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय. विद्यार्थी अ‍ॅडमिशन घेतात कॉलेज मध्ये पण शिकतात अकॅडमी मध्ये. 75% presenty ही compulsory आहे पण सगळे manage करून हे अकॅडमी वाले मुले परीक्षाला बसवितात म्हणुन biometric presenty सक्तीची करण्याची मागणी केली आहे. सदर बाबीत या कोचिंग क्लासेस/ अकॅडमी बंद करून यांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणुन शिक्षण आयुक्त, नॅशनल ह्युमन राइट कमिशन यांच्या कडे देखील तक्रार केली असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment