बारामतीत डॉ.आंबेडकर स्मारक येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

बारामतीत डॉ.आंबेडकर स्मारक येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..

बारामतीत डॉ.आंबेडकर स्मारक येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी 
बारामती दि.३१:- येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे कुशल प्रशासक,आदर्श राज्यकर्त्या,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समुदायीक बुद्ध वंदना घेण्यात आली.समितीचे सदस्य माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे यांनी यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या क्रांतिकारी जीवनकार्यावर प्रकाश टाकत अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी या कार्यक्रमाला शिवाजी शेलार,अरुण कांबळे,रामभाऊ मोरे,ॲड.सुशिल अहिवळे,संजय वाघमारे,मीरा बल्लाळ उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन जयंती महोत्सव समितीचे सदस्य माजी नगरसेवक गणेश सोनवणे,बबलू जगताप,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,विश्वास लोंढे,सुशिल भोसले,नितीन गव्हाळे,चेतन साबळे,चंद्रकांत भोसले,गौतम शिंदे यांनी केले होते.

No comments:

Post a Comment