केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल व माजी मंत्री राम शिंदे यांनी... या कार्यकर्त्याची कौतुकाने धापटली पाठ.. बारामती:- बारामती मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नाव दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल व माजी मंत्री राम शिंदे यांनी बारामतीचे भाजपाचे पदाधिकारी ॲड.गोविंद देवकाते यांना ऐतिहासिक पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा उचित सत्कार व कौतुकाने पाठ थोपटली. एक सामान्य कार्यकर्ता ही एवढं मोठं काम करू शकतो आणि ते पण बारामती मध्ये हे त्यांनी खरंतर करून दाखवलं त्याबद्दल संपूर्ण भाजपा पार्टीला त्यांचा अभिमान वाटतो. कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने काम केलं तर नक्कीच बारामतीमध्ये सुद्धा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा कार्य वाढल्याशिवाय राहणार नाही असे या प्रसंगी सांगितले.मा. मंत्री राम शिंदे यांनी यांचे श्रेय फक्त ॲड. गोविंद देवकाते यांना जातं कारण की त्यांच्याच मागणीनुसार आणि पाठपुराव्यानुसार भारतीय सरकारने सुद्धा या मागणीला मान्यता दिली. आणि 31 मे 2023 रोजी चौंडी येथे जन्मगावी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केले. आज रोजी या महाविद्यालयाला भेट देऊन प्रल्हादसिंग पटेल व राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी भेट देऊन पाहणी केली व येणाऱ्या काळात मोठा कार्यक्रम घेण्याचा सूचित केले. एडवोकेट गोविंद देवकाते यांच्या या ऐतिहासिक पाठपुराव्यामुळे बारामतीमध्ये सर्व स्तरावरती त्यांचं कौतुक करण्यात येत आहे आणि या निर्णयामुळे बारामतीमध्ये वैभवात भर पडलेली असल्याचे सांगण्यात आले.
Post Top Ad
Tuesday, June 6, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल व माजी मंत्री राम शिंदे यांनी... या कार्यकर्त्याची कौतुकाने धापटली पाठ..
केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल व माजी मंत्री राम शिंदे यांनी... या कार्यकर्त्याची कौतुकाने धापटली पाठ..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment