*अभाविप पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत २ प्रस्ताव पारित* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 16, 2023

*अभाविप पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत २ प्रस्ताव पारित*

*अभाविप पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत २ प्रस्ताव पारित*
*शैक्षणिक व सामाजिक विषयात अभाविप चे २ प्रस्ताव पारित*

बारामती:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक दि. १४ व १५ जुलै ला बारामती शहरात संपन्न झाली. या बैठकीत शैक्षणिक व सामाजिक विषयातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन २ प्रस्ताव पारित करण्यात आले. 
 
   महाराष्ट्रातील सर्व अकृषी व तंत्रज्ञान विद्यापीठांमध्ये परीक्षा व निकाल या विषयात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनियमितता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जर सर्व विद्यापीठात अशीच परिस्थिती राहिली आणि विद्यापीठाने ठोस पाऊले उचलली नाहीत तर शैक्षणिक गुणवत्ता व शिक्षण व्यवस्थेचा दर्जा खालावेल तरी प्रदेश कार्यकारिणी याबाबत चिंता व्यक्त करते.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ परीक्षा व निकालांसाठी खाजगी किंबहुना हितसंबंधित अशा कंत्राटी सॉफ्टवेअर कंपनीवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठासाठी अद्ययावत अशी परीक्षा व निकाल प्रणाली सुलभ करणारे सॉफ्टवेअर स्वतः विद्यापीठाने तयार करावे असे आवाहन प्रदेश कार्यकारिणी विद्यापीठ प्रशासनाला  करते.
 राज्यामध्ये सर्वत्र प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या घटना निदर्शनास येत आहेत. अशा घटनांना आळा घालून कायदेशीर मार्गाने व भ्रष्टाचार मुक्त प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्याचे आवाहन प्रदेश कार्यकारिणी करत आहे. शिष्यवृत्ती अर्ज करण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ असल्या कारणाने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यास विलंब होतो. प्रदेश कार्यकारिणी शासनाला सुचवू इच्छिते की शिष्यवृत्ती अर्ज हे प्रवेश प्रक्रिये सोबतच भरून घेण्यात यावेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रशासकीय क्षेत्र व्यापक आहे. महाराष्ट्रात नव्याने चालू होणारे अभियांत्रिकी  व फार्मसी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न होतात. परंतु विद्यापीठाच्या कारभारमध्ये पारदर्शकता व लवचिकता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.  त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेची हेळसांड होत आहे, तसेच विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी व प्रशासन पारदर्शक ठेवण्यासाठी संलग्नता रद्द करायची आहे. अशा महाविद्यालयांना गृह विद्यापीठाशी  संलग्नित होण्याची परवानगी राज्य शासनाने  द्यावी असे  मत प्रदेश कार्यकारिणी व्यक्त करत आहे. खाजगी विद्यापीठात शिक्षण घेत असणाऱ्या  आर्थिक मागास प्रवर्गातील १०%  विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५०% सवलत देण्याचा राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे प्रदेश कार्यकारिणी स्वागत करत आहे. बैठकीला उपस्थित सर्व प्रतिनिधी कार्यकर्त्यांशी शैक्षणिक विषयातील या मुद्द्यांना घेऊन चर्चा करण्यात आली. 

तसेच, ओडीसा राज्यातील बालासोर येथे रेल्वे अपघातात तसेच बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, बारामती भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. मणिपूर येथे सुरू असलेली हिंसा ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. ही हिंसा थांबवण्यासाठी स्थानिक प्रशासन व केंद्र सरकार यांनी समन्वयाने कठोर पाऊले उचलावीत. असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, बारामती मत व्यक्त करते. देशाच्या नवीन संसद इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सेंगोल धर्म दंडाची स्थापना ही भारतीय संस्कृतीची पूर्नस्थापनेचे प्रतीक असून ही बाब सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी बैठक, बारामती स्वागत करते. आषाढी वारी निमित्त देहू, आळंदी, पंढरपूर वारी मार्गावर समाजातील विविध संस्था संघटनांच्या मार्फत चालवले जाणारे उपक्रम हे कौतुकास्पद आहेत. निसर्ग वारी, निर्मल वारी, मोफत वैद्यकीय शिबीर अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, बारामती अभिनंदन करते.  भारतीय संस्कृतीवर घाला घालणाऱ्या परकीय आक्रमकांचे महाराष्ट्रामध्ये विनाकारण होत असलेले उदात्तीकरण समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. ही समाजाच्या एकात्मतेसाठी चिंतनाची बाब आहे. असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक, बारामती व्यक्त करते.  ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदू साम्राज्य दिन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून देशभरातील नागरिकांनी वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू साम्राज्य दिनाचे महत्त्व पोहोचवावे. असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक, बारामती करते.  विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये G20 अंतर्गत येणाऱ्या देशातील शैक्षणिक समूहाची बैठक पार पडली. ही बैठक भारतासह जगभरातील बदलत्या शैक्षणिक प्रणालीला दिशा देण्यासाठी महत्त्वाची आहे. या बैठकीमुळे जगभरात शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रासह पुणे शहराची लौकिक उंची वाढवणारी बाब ठरली. ही बाब अभिनंदनीय आहे. असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, बारामती मत व्यक्त करते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात एका विद्यार्थिनीवर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. तसेच नुकतीच प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या एका विद्यार्थिनीची निर्घृणपणे हत्या केली. यामागे सध्याच्या युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर चा बसवण्यासाठी गृह मंत्रालय विभाग व पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, बारामती चिंता व्यक्त करते. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग, विद्यार्थी निधी ट्रस्ट व भारतीय स्त्रीशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सशक्त करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभरात राबविण्यात येणाऱ्या राजमाता जिजाऊ स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून ३,५०,००० विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल आवश्यक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, बारामती अभिनंदन करते. अभाविपचे पूर्व कार्यकर्ते डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या नगर येथील स्नेहालय या संस्थेच्या शाळेला जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक मिळाला ही अभिमानास्पद बाब आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, बारामती स्नेहालय या संस्थेचे अभिनंदन करते, सामाजिक विषयातील या मुद्द्यांना घेऊन चर्चा झाली.

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, “अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाच्या या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला उपस्थित सर्व प्रतिनिधी कार्यकर्त्यांच्या संमतीने हे दोन्ही प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत. बैठकीनंतर च्या पुढील आगामी काळात या मुद्द्यांना प्रामुख्याने लक्षात ठेवून अभाविप कार्यकर्ते आपल्या क्षेत्रात कार्य करतील. प्रस्ताव पारित करण्यासाठी संमती दर्शविताना अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश चे प्रतिनिधी कार्यकर्ते.

*अधिक माहितीसाठी संपर्क*
प्रगती कराड ९३५९१६५१४३
(प्रदेश मीडिया संयोजक, अभाविप पश्चिम महाराष्ट्र)

No comments:

Post a Comment