बापरे.. महसूल विभाग घेतंय झोपीचं सोंग?म्हणून पोलिसांना करावी लागतेय कारवाई;5वाळू तस्करावर कारवाई करीत 33 लाखांचा मुद्देमाल केला जप्त..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 30, 2023

बापरे.. महसूल विभाग घेतंय झोपीचं सोंग?म्हणून पोलिसांना करावी लागतेय कारवाई;5वाळू तस्करावर कारवाई करीत 33 लाखांचा मुद्देमाल केला जप्त..!

बापरे.. महसूल विभाग घेतंय झोपीचं सोंग?म्हणून पोलिसांना करावी लागतेय कारवाई;5
वाळू तस्करावर कारवाई करीत 33 लाखांचा मुद्देमाल केला जप्त..!
 सुपे:- बारामती तालुक्यातील नदी व ओढया लगत बेकायदेशीर वाळू उपसा चालू असून यावर महसूल विभाग करीत नसून तलाठी व मंडलाधिकारी हे बघ्याची भूमिका घेत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत,प्रशासनात अनेक नवीन अधिकारी आले असून त्यांना याची कल्पना कदाचित नसावी की राजरोसपणे वाळू, मुरूम, माती ची तस्करी चालू असून शनिवार व रविवारी हमखास अशी वाहतूक होताना दिसत असूनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले,कऱ्हा व नीरा नदीच्या पात्रात वाळू उपसा चालू असून सोनगाव,झारगडवाडी,जळगाव,खांडज,सांगवी, मेखळी, निरावागज,बऱ्हाणपूर, शिरसुफळ अश्या अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा होत असताना तेथील तलाठी, मंडलाधिकारी याकडे कानाडोळा करीत असतात वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे कळतंय, नुकताच पोलिसांनी केलेल्या कारवाई ची माहिती मिळाली असून दि.30 ऑगस्ट रोजी पहाटे तीन च्या सुमारास सुप्याच्या पोलीस ठाण्याच्या पथकाने
काऱ्हाटी गावच्या हद्दीतील कऱ्हानदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या पाच वाळू तस्करांविरोधात पर्यावरण रक्षण रक्षण अधिनियम 9,15,सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम 3,4 अन्वये गुन्हा दाखल केला व
दोन ट्रक, एक स्विफ्ट कार असा 33.80
लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आज पहाटे
अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची
गोपनीय माहिती सुप्याचे प्रभारी अधिकारी
नागनाथ पाटील, हवालदार राहुल भाग्यवंत, पोलीस अंमलदार सचिन दरेकर व धायगुडे यांना मिळाली आणि त्यांनी खाजगी वाहनाने हे ठिकाण गाठले. या पोलीस पथकाने जळगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अंधारात दबा धरून सापळा रचला, तेव्हा पहाटे साडेतीन
वाजण्याच्या सुमारास जळगाव गावातून
दोन संशयित ट्रक लाईट बंद करून
काहाटी गावच्या दिशेने जाताना दिसले.
या ट्रकला हात करून थांबवून चालकाकडे
चौकशी केली असता, दोन्ही ट्रकमध्ये
अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याचे
आढळून आले. या ट्रकच्या मालकाविषयी चालकाकडे विचारणा केली असता, त्याने मागील
चारचाकी गाडीमध्ये मालक असल्याचे
सांगितले, तेव्हा ती स्विफ्ट कार ( नं. एम.
एच. 12 एन इ 78 81) व त्यातील दोघांना
ताब्यात घेतले आणि सुप्याच्या पोलिस
ठाण्यात आणले.ट्रकचालक महेश राजेंद्र यादव (वय 31 वर्ष रा. मुरूम ता. उमरगा जि. उस्मानाबाद), ट्रकचालक महेश राजेंद्र यादव (वय 31 वर्ष रा. मुरूम ता. उमरगा जि. उस्मानाबाद),
चेतन मारुती वाबळे (वय 25 वर्षे रा.
उरळीकांचन ता. हवेली जि. पुणे), आकाश
रावसाहेब व्यवहारे (रा. लोणी काळभोर ता.
हवेली), नामदेव पोपट वाघमोडे (रा.उरुळी कांचन ता. हवेली) व वाळू भरून देणारा देवा जगताप (पूर्ण माहित नाही) या पाच जणाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 37934 पर्यावरण संरक्षण अधिनियम 9 15 सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम तीन-चार अन्वये गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये दहा ब्रास वाळू, टाटा
कंपनीचे दोन ट्रक, स्विफ्ट कार असा
मिळून 33 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज
पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्याचा
पुढील तपास फौजदार समाधान लवटे
करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक
अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक
आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस
अधिकारी गणेश इंगळे यांच्या
मार्गदर्शनाखाली सुप्याचे पोलीस ठाण्याचे
सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील,
फौजदार समाधान लवटे, फौजदार पांडुरंग
कण्हेरे, सहायक फौजदार रवींद्र मोहोरकर, हवालदार राहुल भाग्यवंत, अनिल दनाने,
संदीप लोंढे, सचिन दरेकर, तुषार जनक,
दीपक धायगुडे, रवींद्र धायगुडे यांच्या
पथकाने केली.

No comments:

Post a Comment