मंदिर चोरीतील सात वर्षे फरार आरोपीच्याआवळल्या मुसक्या;जेजुरी पोलिसांची दमदार कामगिरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 30, 2023

मंदिर चोरीतील सात वर्षे फरार आरोपीच्याआवळल्या मुसक्या;जेजुरी पोलिसांची दमदार कामगिरी..

मंदिर चोरीतील सात वर्षे फरार आरोपीच्या
आवळल्या मुसक्या;जेजुरी पोलिसांची दमदार कामगिरी..
जेजुरी:-जेजुरी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी केल्याची माहिती पुढे आली असून पुरंदर तालुक्यातील पिर्सटी येथील
वाघेश्वर मंदिराचे कुलूप तोडून देवीची मुकुट व
दागिने असा 96000 रुपये किमतीच्या ऐवज
चोरीला गेला होता. ही घटना सात वर्षांपूर्वी
दिनांक पाच फेब्रुवारी 2015 रोजी घडली होती.
या गुन्यातील फरार आरोपींना पकडण्यात जेजुरी
पोलिसांना यश आले आहे. सदर प्रकरणी विश्वास
लक्ष्मण शिरसागर राहणार पिंगोरी यानी जेजुरी
पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. १) जीवन मारुती सहाब राजपूत उर्फ नानावत
वय 65 वर्ष मूळ राहणार नांदूर तालुका दौंड
जिल्हा पुणे सध्या राहणार गोणवली तालुका खेड
जिल्हा पुणे २) प्रमोद जीवन राजपूत उर्फ नानावत वय 32 वर्षे राहणार नांदूर तालुका दौंड जिल्हा पुणे सध्या राहणार गोरावडी तालुका खेड जिल्हा पुणे हे कोठे राहतात याबद्दल काही माहिती नसताना त्यांच्या बाबत गोपनीय बातमीदार मार्फत माहिती काढून वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांना दिनांक 30 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चाकण परिसरातून ताब्यात घेऊन उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस
अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे
अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे
भोर विभाग सासवड, यांच्या आदेशाप्रमाणे जेजुरी पोलिसांची दमदार कामगिरी करीत मंदिर मार्फत माहिती काढून वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांना दिनांक 30 ऑगस्ट रोजी पहाटेच्या
सुमारास चाकण परिसरातून ताब्यात घेऊन
उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस
अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे
अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे
भोर विभाग सासवड, यांच्या आदेशाप्रमाणे
पोलीस निरीक्षक जेजुरी बापूसाहेब सांडभोर
जेजुरी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली
जेजुरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे
पोसई साबळे, सहाय्यक फौजदार डी एस
बनसोडे, पोलीस हवालदार प्रवीण शेंडे, पोलीस
कॉन्स्टेबल यांनी दाखल गुन्ह्यातील फरार
आरोपींना ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment