खरेदी विक्रीच्या व्यवसायात बारामतीत एकाची लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 21, 2023

खरेदी विक्रीच्या व्यवसायात बारामतीत एकाची लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल..

खरेदी विक्रीच्या व्यवसायात बारामतीत एकाची लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल..                                                         बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 613/2023 भादवी कलम 406,420 प्रमाणे योगेश संजय महाडिक वय 28 वर्षे रा. पंचशिलनगर कसबा बारामती यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे किशोर महादेव देशमाने वय 28 वर्षे व्यवसाय रा कुरवली ता इंदापुर जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 28/11/2022 रोजी पूर्वी नक्की वेळ माहीत नाही श्रीरामसिटी फायनान्स कसबा बारामती येथे योगेश संजय महाडिक वय 28 वर्षे रा. पंचशिलनगर कसबा बारामती ता बारामती पुणे  हे गेल्या चारवर्षा पासुन विविध कंपन्याच्या गाडया खरेदी करुन त्या गाड्याच्या विक्रीचा व्यवसाय करत होते. यातील आरोपी मजकुर व फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे होते आणि आरोपी मजकुर हा सुध्दा फिर्यादी याच्या प्रमाणे खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्या दरम्यान आरोपी मजकुर याने फिर्यादी यांना श्रीरामसिटी मुनियन फायनान्सच्या भरपुर गाड्याचा स्टाक निघाला आहे, तु पैसे लाव मी गाड्या विक्री करून देतो असा विश्वास फिर्यादीस दिला होता त्यानुसार फिर्यादी यांना श्रीरामसिटी फायनान्स याच्याकडे 5,43500 रूपये  भरून एकूण 21 गाड्या  सर्व मिळुन एकुण 3 लाख किंमतीच्या गाडया विकुण फिर्यादीस पैसे देणार असा विश्वास दिला होता आणि प्रत्येक गाडी विकल्यानंतर नोटरी करून  सहमती घईन असे म्हणाला होता.. त्यावर फिर्यादि यांनी व्यवसाईक हेतुने  विश्वास ठेवला होता व फिर्यादी यांनी आरोपी मजकुर यास  कोणतीहि सहमती दिली नसताना सदरच्या मोटार सायकली स्वताहा विक्री करून फिर्यादीची फसवणूक केली त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी मजकुर यास माझे गुंतवलेले पैसे मला परत दे असे म्हणाले असता आरोपी मजकुर फसवणुकीच्या हेतुने  AU स्मॉल फायनान्सचा चेक क्र. 000005 हा खोटी सही करून फिर्यादीस  दिला त्यावेळी तो  चक न वटणाल्याने आरोपी मजकुर यास  फिर्यादीने विचारण केली असता अरोपी मजकुर यांनी फिर्यादीस दमदाठी करून खोट्याा सावकारी केसमध्ये गुंतवण्याची धमकी देवुुन फिर्यादीची अर्थीक फवणुक केली त्या बाबात फिर्यादीने मा. प्रथमवर्ग न्यायालय बारामती  मा. एस एच. अटकरे यांचे कोर्टात फिर्याद दाखल केल्याने मा.न्यालयाने त्यांचे कार्यालय जा.क्र. 1155/23 प्रमाणे भादवी कलम 406.420 सदरची फिर्याद 
 दाखल अंमलदार -Asi सातपुते यांनी करून घेतली तर तपास अंमलदार - पो हवा 1920 मोरे हे करीत आहे.

No comments:

Post a Comment