बारामती नगरपालिका प्रशासनाने केली जामदार रोड वासियांच्या डोळ्यात धूळफेक..? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 29, 2023

बारामती नगरपालिका प्रशासनाने केली जामदार रोड वासियांच्या डोळ्यात धूळफेक..?

बारामती नगरपालिका प्रशासनाने केली जामदार रोड वासियांच्या डोळ्यात धूळफेक..?
बारामती:- खराब रस्ता आणि धुळीचे साम्राज्य म्हणजे जामदार रोड  हा रस्ता वर्षभरापासून खराब अवस्थेत आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड धुळीचे साम्राज्य आहे.धुळीने नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहे. त्यामुळे त्वरित या रस्त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. अशी जनते मधुन प्रतिक्रिया येत आहे, बारामतीचा विकास पाहायचा असेल तर नक्की जामदार रोडला या म्हणजे उघड्या डोळ्याने विकास पाहायला मिळेल, जामदार रोड या रस्त्यावर बारामती नगरपालिकेचे रस्त्याचे काम चालू असून ते काम गेले २ महिने बंद आहे रस्त्यावर धुळीचे

प्रमाण खूप वाढले आहे .त्यामुळे तेथील रस्त्याच्या कडेला असणारे व्यावसायिक आणि रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे .एकीकडे नेते विकासाच्या गप्पा मारताना दिसतात. मात्र रस्त्याच्या कामाकडे कुणाचेही लक्ष् नाही .रस्त्याचे काम हे  गोगलगायीच्या  गतीप्रमाणे चालले आहे .त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .याचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर रस्ता पुर्ण झाला नाहीतर संभाजी ब्रिगेड नागरिकांच्या या प्रमुख मागणी साठी याचं रस्त्यावरील खडी ही मुख्याधिकारी यांना भेट स्वरुपात देऊन त्यांचा सत्कार करत बारामती नगरपालिका समोर संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे असे शिवश्री असलम रज्जाक तांबोळी अध्यक्ष संभाजी ब्रिगेड बारामती शहर यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment