*बारामतीत अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 1, 2023

*बारामतीत अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*

*बारामतीत अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी*
बारामती:- साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०३ वा जयंती महोत्सव साठे नगर कसबा भागात अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व लहुजी प्रतिष्ठान पाॅंईंट यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती महोत्सव साजरा करण्यात आला सकाळी ११ वाजता साठे नगर या ठिकाणी पुजापाठ व अंगणवाडी तील मुलांना शालेय साहित्य,खेळणी,कपडे,स्कुल बॅग वाटप करण्यात आले सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे साहेब, उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील साहेब,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजी नाना होळकर , बारामती शहर  राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जयदादा पाटील,यांच्या हस्ते पुष्पहार हार अर्पण करून आण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले मंडळाच्या विविध उपक्रमांचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे  यांनी कौतुक केले तसेच संध्याकाळी ६ वाजता  आण्णाभाऊ साठे तरुण, मंडळ,लहुजी प्रतिष्ठान पाॕंईट,जय लहुजी फ्रेंड सर्कल, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, लहुजी शक्ती सेना बारामती, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना बारामती, लहुजी स्वराज्य सेना, स्वाभिमानी लहुजी शक्ती सेना बारामती,सत्य शोधक बहुजन आघाडी, साठे नगर मधील विवीध संघटनां व संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने भव्य अशा शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते  उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे ,बारामती शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे , दत्तात्रय काका सातव,मा.नगरसेवक सुरजशेठ सातव,माजी शहराध्यक्ष नगरसेवक सुभाष आप्पा ढोले, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेस सुरुवात झाली शोभा यात्रे महीलांचा विशेष सहभाग होता याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक माळवे साहेब, पाटील साहेब माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ,भारतदादा अहीवळे,कुंदन लालबीगे,प्रा रमेश मोरे सर,साधु बल्लाळ,विशाल जाधव, चंद्रकांत खंडाळे,दिनेश जगताप,शुभम अहीवळे बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष उमेश काळे, उपाध्यक्ष योगेश गाडेकर,पी.टी.गांधी,अॅड बापु शिलवंत,अॅड अमोल सोनवणे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष विजय खरात,अॕड अमृत नेटके, अॕड स्वप्निल खरात,अहमद तांबोळी,सागर जाधव,राहुल खरात ,सनी खरात,विजय सकट, विशेष आवळे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधु बल्लाळ यांनी केले तर आभार अॕड स्वप्निल खरात यांनी केले..

No comments:

Post a Comment