शासन परिपत्रकानुसार २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करावा सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांचे बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 12, 2023

शासन परिपत्रकानुसार २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करावा सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांचे बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

शासन परिपत्रकानुसार २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करावा सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांचे बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
बारामती:- माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात दिनांक १२/ १० / २००५ पासून लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झालेला आहे तरी देखील नजीकच्या काळात कोविड मुळे व अधिकारी वर्गाच्या उदासीनतेने आपल्या तालुक्यात दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून लुप्त होत चाललेला आहे. बारामती तालुक्यात माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरता व प्रभावी अंमलबजावणी करिता तालुकास्तरावर सर्वतोपरी उपाययोजना करण्यात याव्यात शासन परिपत्रकानुसार दिनांक २८ सप्टेंबर रोजी बारामती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा. तसेच या दिवशी माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती बाबतची माहिती विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून बारामती तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी.
          यासाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा महाविद्यालय उच्च व तंत्रशिक्षण विभाग व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारित निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वकृत्व स्पर्धा चर्चासत्र व्याख्यानमाला अधिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. सर्व शासकीय कार्यालयात बारामती तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व अशासकीय समाजसेवी संस्था व सामाजिक संस्था यांचे मदतीने प्रत्येक कार्यालयातील माहिती अधिकार कायदा व अधिनियम २००५ चे प्रशिक्षण चर्चासत्र व्याख्यानमाला आयोजित करण्यात याव्यात.या सर्व मागण्यांसाठी उचित आदेश पारित करावेत असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी दि.11 सप्टेंबर रोजी बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment