बापरे..जागेच्या व्यवहार कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही,यातील एका प्रकरणात धमकावल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 13, 2023

बापरे..जागेच्या व्यवहार कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही,यातील एका प्रकरणात धमकावल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

बापरे..जागेच्या व्यवहार कुठल्या थराला जाईल हे सांगू शकत नाही,यातील एका प्रकरणात
धमकावल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..
 पुणे:- लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती बिकटची झाली काढलेले कर्ज फेडू शकले नाही तर कुणी सावकारी पायी बळी गेले तर कित्येकांचे संसार उघड्यावर पडले तर अजूनही यातून काही लोक सावरले नाहीत अश्या परिस्थितीत आत्महत्या सारखे प्रकार घडले असल्याचे दिसते नुकताच काही वर्षांपूर्वी त्यांनी जमीन घेतली होती.आर्थिक अडचण असल्याने आता त्या जमिनीची विक्री करु पहात होते. परंतु,
हा व्यवहार करु नये, यासाठी सतत देत असलेल्या धमकीमुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार
समोर आला आहे. विजयकुमार कुटे (वय ४३, रा.
कुंजीरवस्ती, मांजरी) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी मनिषा विजयकुमार कुटे (वय ३२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १३६५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन आनंदा इंगळे (वय ३५,रा. खराडी,
चंदननगर), आनंदा इंगळे (वय ५०, रा.
चंदननगर) आणि तानाजी भोर (वय
५२, रा. केसनंद) यांच्यावर आत्महत्येस
प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कुंजीर वस्तीत सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत
दिलेल्या माहितीनुसार,कुटे हे ऑरिक्स फायनान्स कंपनीमध्ये पोलिसांनी विजयकुमार कलेक्शन
एक्झीक्युटीव्ह म्हणून नोकरी करीत होते. त्यांना ९ व ७ वर्षाच्या दोन मुली आहे. यापूर्वी ते श्रीराम
कंपनीत कामाला होते. त्यावेळी सचिन इंगळे याने त्यांच्या फायनान्स कंपनीकडून ओला उबेरसाठी गाड्या फायनान्स घेतल्या होत्या. त्यावरुन त्यांच्यात ओळख झाली होती.
 विजयकुमार व त्यांचे मित्र प्रशांत कुलकर्णी यांनी २०१९ मध्ये सचिन इंगळे याच्याकडून वाडे बोल्हाई येथे ११ गुंठे जागा खरेदी केली होती. या जमिनीचे खरेदी खतही विजयकुमार व प्रशांत कुलकर्णी यांच्या भावजयीच्या नावे झाले होते.
या जागेला आता चांगला भाव आल्याने ती जागा विकण्याचा विचार ते करत होते.तसेच विजयकुमार यांना क्रेडिट कार्डचे व बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज होती.तेव्हा जागेचे मुळ मालक तानाजी भोर यांनी विजयकुमार यांना सचिन इंगळे याने व्यवहार करताना माझे पूर्ण पैसे दिलेले नाही. त्यामुळे तुम्ही जागा विकू
शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी
सचिन इंगळे याला तानाजी सोबतचा व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले. परंतु, त्याने तसे न
करता विजयकुमार यांना माझी जागा
परत कर नाही तर तुला जीवे ठार मारीन, अशी जून २०२३ पासून धमकी देऊ लागला. विजयकुमार यांनी जमीन विकू नये, यासाठी तिघे त्यांच्याबरोबर वारंवार बाहेर मिटिंग करुन दबाव
आणत होते. एका बाजूला कर्जाचे ओझे तर दुसरीकडे जमीन विकू नये,म्हणून दिल्या जात असलेल्या धमक्या यामुळे त्यांनी घरात कोणी नसताना दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक डगळे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment