दलित -मुस्लिम अत्याचाराची मालिका थांबणार कधी? पंकज धिवार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 28, 2023

दलित -मुस्लिम अत्याचाराची मालिका थांबणार कधी? पंकज धिवार

दलित -मुस्लिम अत्याचाराची मालिका थांबणार कधी? पंकज धिवार
 सासवड:- धर्मसत्ता आणी राजसत्ता ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्या देशाची वाटचाल अधोगतीकडे होत असते.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी पत्रकार परिषदेत केले.यावेळी त्यांनी असेही म्हटले की महाराष्ट्रात वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे.धार्मिक दलालांची मक्तेदारी वाढल्यामुळे दलित -मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे.राजकीय सत्तेकडे जाण्याचा मार्ग धार्मिक दंगली मधूनच जातो.त्याप्रमाणे विशिष्ट जातींच्यावर अत्याचार केले जात आहेत.नांदेड येथील बोंढरा हवेली मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या बौध्द युवकाची हत्या करण्यात आली.अहमदनगर येथील हरेगाव मध्ये कबुतर चोरल्याच्या संशयावरून बौध्द मुलांना उलटे टांगून मारण्यात आले.अकोले येथे लोखंडी रौड ने महिलांना मारले,सातारा जिल्ह्यातील पानवन येथे मातंग  भगिनीला मारहाण करण्यात आली ,सातारा जिल्ह्यातील पुसे सावली येथे मुस्लिम युवकांची निघरून हत्या करण्यात आली,सासवड येथे लव जिहाद च्या नावाखाली मुस्लिम युवकाला बेदम मारले,अंतरली -सराटी गावामध्ये मराठा क्रांती मोर्चा मधील लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला त्यामध्ये कित्येक लोक जखमी झाले .त्यांच्यावर्  लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.पारधी समाजाला हक्काचा निवारा,जातीचा दाखला,रेशनकार्ड मिळालेच पाहिजे.जेजुरी येथील हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये मुस्लिम समाजा बद्दल अपशब्द वापरणाऱ्या विक्रम पावसकर कारवाई करण्यात यावी.महात्मा गांधी,महात्मा फुले व संभाजी महाराज यांचे बद्दल अपशब्द वापरणाऱ्या मनोहर भिडे उर्फ संभाजी कुलकर्णी वर कारवाई करण्यात यावी.अशा सर्व घटनेच्या निषेधार्थ सासवड येथील शिवतीर्थ चौकात दि. 5 ऑकटोबर रोजी सकाळी 11 वाजता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे.या मोर्चाला बहुसंख्येने सामील व्हावे असे आवाहन पंकज धिवार यांनी यावेळी केले.या मोर्चामध्ये अनेक संस्था ,संघटना सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment