मराठा आरक्षणासाठी "अजित पवार सरकारच्या बाहेर पडा" या घोषणांनी बारामती दणाणली ..
बारामती:- मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 'सरकारचा भरलाय घडा अजित पवार
सरकारच्या बाहेर पडा' अशा घोषणांनी मराठा
आंदोलकांनी बारामती दणाणून सोडली आहे. मराठा संघटनांनी आज बारामती बंदची हाक दिली असून मोठा मोर्चा काढण्यात येत आहे. याचवेळी या रॅलीत अनेक मराठा बांधवांनी अजित पवारांच्यासंबंधी या अशा घोषणा दिल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा मराठा समाज मोठ्या संख्येने एकवटला असून राज्यभर ठीक ठिकाणी बंद पाळण्यात आला. बारामतीत देखील बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चेकरी बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून भिगवन चौकात पोहोचले. या ठिकाणी हुतात्मा स्तंभाजवळ मोर्चेकरांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात
आली. याशिवाय अजित पवारांना सरकारमधून
बाहेर पडा, असे आवाहन देखील करण्यात आले.यावेळी विविध मराठा आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भाषणे करून सरकार टीका केली.
No comments:
Post a Comment