खळबळजनक...महिला पोलिसावर अघोरी पूजा करत मित्रांसह भोंदूबाबाचे लैंगिक अत्याचार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 16, 2023

खळबळजनक...महिला पोलिसावर अघोरी पूजा करत मित्रांसह भोंदूबाबाचे लैंगिक अत्याचार...

खळबळजनक...महिला पोलिसावर अघोरी पूजा करत मित्रांसह भोंदूबाबाचे लैंगिक अत्याचार...
पालघर:- भोंदूगिरीच्या नावाखाली अनेकांना गंडा घातले जात असताना आत्ता महिलांवर लैगिंक अत्याचार देखील वाढत असल्याचे दिसते,महिला अत्याचाराचे प्रमाणात वाढ होत असताना जिथे न्याय मागायचा तिथे महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की,पालघर जिल्ह्यातील
तलासरी तालुक्यात महिला पोलीस कर्मचारीवर
भोंदूबाबाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित पोलीस कर्मचारी महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर भोंदूबाबासह त्याच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलीसांनी रवींद्र नारायण बाटे (४५)याच्यासह दिलीप गोविंद गायकवाड (४२), गणेश रामजी
कदम, महेंद्र चंदाराम कुमावत आणि गौरव साळवी, यांना अटक केली आहे.तुझ्या नवऱ्याला सरकारी नोकरी लावतो, घरात सुख-शांती
राहील, असे सांगून भोंदूबाबाने आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पूजाविधी करण्यासाठी महिलेला मठात बोलावले. या मठाताही तिच्यावर अघोरी पूजा करत मित्रांसह महिलेवर अत्याचार केले.या भोंदूबाबाने या महिला पोलिस कर्मचारीकडून २ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेतले. नंतर त्याने पोबारा केला. यानंतरही भोंदुबाबाने महिलेला सतत ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले.या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पोलिस महिलेने
तलासरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment