*76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू-बारामतीसह महाराष्ट्रातून 15000:हजार स्वयंसेवकांचा सहभाग* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

*76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू-बारामतीसह महाराष्ट्रातून 15000:हजार स्वयंसेवकांचा सहभाग*

*76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत तयारी सुरू-बारामतीसह महाराष्ट्रातून 15000:हजार स्वयंसेवकांचा सहभाग*
 बारामती - अशोक कांबळे 
      बारामती (प्रतिनिधी) - संत निरंकारी मिशनच्या गेल्या 75व्या संत समागम प्रमाणे यावर्षीही आध्यात्मिक स्थळ समलाखा येथे 28, 29 आणि 30 ऑक्टॉबर ला संपन्न होणाऱ्या 76व्या संत समागमाच्या पूर्व तयारीसाठी बारामतीसह महाराष्ट्रातून सुमारे 15000 संत निरंकारी स्वयंसेवाकांनी सहभाग घेतला असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
     सदर सामगम निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रूपाने संपन्न होणार असल्याने या सामगमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
      या समागमाचा दैवी आनंद जगभरातून येणारे सर्व निरंकारी भक्त आणि श्रद्धाळू भाविक घेतील. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण निरंकारी जगतात मोठ्या उत्साहाचे वातावरण असून प्रत्येक प्रांतातील भक्त 'वसुधैव कुटुंबकंम' या सुंदर अनुभूतीसह एकत्वाच्या रूपात सदगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांची दिव्य अमृतवाणी श्रवण करण्याचा आनंद लुटतील. निःसंशयपणे, हे एक अलौकिक दृश्य असेल जिथे सर्व लोक आपली भाषा, जात, धर्म आणि सर्वस्व विसरून जातील आणि 'एकत्वाच्या' दिव्य अनुभूतीचा साक्षात्कार करून घेतील.
    समागम म्हणजे संतांचा पवित्र संगम, या दैवी सोहळ्याची जय्यत तयारी निरंकारी भक्तांकडून पूर्ण समर्पणाने, निस्वार्थी व निष्काम भावनेने केली जात आहे. जिकडे पाहावे तिकडे हजारो भक्त नि:स्वार्थपणे आपली सेवा करत आहेत.
     लहान मुले, तरुण आणि वृद्ध सर्व भक्तगण या सेवांमध्ये उत्साहाने आणि मनापासून योगदान देत आहेत. एका ठिकाणी  मैदाने सपाट करण्यासाठी मातीने भरलेली  घमेली तर दुसऱ्या बाजूने रिकामी घमेली घेऊन जाताना भाविक दिसत आहेत. लहान मुलेही चिमुकल्या हातात घमेली धरून सेवेचा आनंद लुटत आहेत. सर्वत्र निस्वार्थ सेवेचा अनोखा नजारा  पाहायला मिळत आहे . येणार्‍या सर्व श्रद्धाळू, भाविक सज्जनांचे भव्य स्वागत करण्यासाठी हे सर्व केले जात आहे
    या पूर्वतयारीसाठी बारामतीसह महाराष्ट्रातून मागील दोन महिन्यापासून निरंकारी सेवादल स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण नियमितपणे समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीच्या कार्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून सुमारे पंधरा हजार स्वयंसेवकांचा समावेश आहे. 
    समागमासाठी येणाऱ्या संतांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी  तंबू उभारण्यासारखी अनेक सेवाकार्य  सेवादारांकडून मोठ्या उत्साहाने सुरू आहेत. समागम स्थळावर मुख्य सत्संग पंडालच्या व्यतिरिक्त अधिक संख्येने निवासी टेंट उभारण्यात येत आहेत. भक्तगणांच्या अहोरात्र निस्वार्थी सेवेचे सकारात्मक फलित म्हणजे अल्पावधीतच तंबूंनी सजलेले सुंदर शहर एका आकर्षक समागम स्थळात रूपांतरित होणार आहे.
    76व्या वार्षिक निरंकारी संत समागमात संपूर्ण भारत तथा देश विदेशातून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. निरंकारी सेवादलाचे बंधू आणि भगिनी निळा आणि खाकी गणवेश परिधान करून, रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विमानतळावर येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करताना आणि त्यांना त्यांच्या पूर्वनिश्चित निवासस्थानी नेण्याची व्यवस्था करताना दिसतील.

No comments:

Post a Comment