धक्कादायक..बारामतीत युवकावर खुनी हल्ला..बारामतीत स्वच्छता अभियान राबविताना खऱ्या अर्थाने वाढलेली गुन्हेगारी साफ होईल का दादा? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 1, 2023

धक्कादायक..बारामतीत युवकावर खुनी हल्ला..बारामतीत स्वच्छता अभियान राबविताना खऱ्या अर्थाने वाढलेली गुन्हेगारी साफ होईल का दादा?

धक्कादायक..बारामतीत युवकावर खुनी हल्ला..बारामतीत स्वच्छता अभियान राबविताना खऱ्या अर्थाने वाढलेली गुन्हेगारी साफ होईल का दादा?
बारामती दि.1ऑक्टोबर:-संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असताना याच पार्श्वभूमीवर बारामतीत देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः या अभियानात सकाळ पासून सहभागी झाले होते मात्र एक वाऱ्यासारखी बातमी आली ती धक्कादायक होती दि.30 सप्टेंबर च्या रात्री 10:30 ते11 च्या दरम्यान म्हणे शहरातील वसंतनगर भागाशेजारी असणाऱ्या कॅनेल पुला नजीक एका छोटया टपरीवर व्यवसाय करणाऱ्या युवकावर काही अनोळखी इसमानी लोखंडी  हत्याऱ्याने (कोयता किंवा रॉड) युवकावर जोरदार हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी अवस्थेत पडला असता बारामती शहर पोलिसांना खबर मिळाल्याने तात्काळ जखमीस उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,ही बातमी पसरली आणि पुन्हा बारामती मध्ये गुन्हेगारी वाढ होते की काय याची परिसरात भिती निर्माण झाली, रात्री घटना घडतेय आणि सकाळी उपमुख्यमंत्रीचा बारामती दौरा व  हजरत पैगंबर जयंती मिरवणूक बंदोबस्त तयारी यामुळे पोलीस प्रशासनावर नक्कीच ताण पडला असेल,तपास चालू असून खऱ्या अर्थाने कचरा साफ करत असताना गुन्हेगारी साफ करायचा संकल्प करायला हवा अशी प्रतिक्रिया उमटत आहे, अधिक सविस्तर बातमी लवकरच.

No comments:

Post a Comment