देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल
मीडियावर शिवीगाळ,तरुणावर गुन्हा दाखल..
पुणे :- आपल्या भारत देशात कोणत्याही वरीष्ठ नेत्याबद्दल अपशब्द बोलू नये शिवीगाळ करू नये असे असताना आजकाल पातळी पार घसरली असून कोणी कुणाचीच तमा बाळगत नसल्याचे दिसत आहे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हिंदू देवी-देवतांना सोशल मीडियावर अश्लील
भाषेत शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 6 ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास वाघोली येथे घडला
आहे. सागर सावंत (वय-21 रा. निओ सिटी
मागे, बी.जे.एस. कॉलेज वाघोली)याच्यावर आयपीसी 295 (अ) नुसार गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र दिलीप पडवळ(वय-30 रा. वडकी गाव, ता. हवेली)
यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,
आरोपी सागर सावंत याने फिर्यादी यांच्या बीड येथे राहणाऱ्या मित्राच्या पोस्टवर इन्स्टाग्रामवरील
कमेंट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच
हिंदु देवी-देवतांबद्दल अश्लील विधान केले. आरोपीने हिंदुंच्या धार्मिक भावनांचा अपमान करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत
नमूद केले आहे. फिर्यादी यांनी याबाबत
तक्रार देताच पोलिसांनी आरोपी विरुद्ध
गुन्हा दाखल केला आहे. पुढील सहायक पोलीस निरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment