बारामती मार्केट कमिटी मध्ये शासकीय मका खरेदी केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 7, 2023

बारामती मार्केट कमिटी मध्ये शासकीय मका खरेदी केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

बारामती मार्केट कमिटी मध्ये शासकीय मका खरेदी केंद्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू 
बारामती:- किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप पणन हंगाम २०२३-२०२४ मध्ये विकेंद्रीत धान खरेदी योजने अंतर्गत हमीभावाने भरडधान्य (मका) खरेदी साठीची ऑनलाईन नोंदणी दि. १ ऑक्टोबर २०२३ पासुन सुरू झाली असुन  दि. ३० नोंव्हेबर २०२३ पर्यन्तची मुदत आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतक-यांचीच मका प्रति क्विंटल दर रू. २०९०/- ने खरेदी करणेत येणार आहे. सध्या मकेचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बारामती मार्केट कमिटीने शासनाकडे हमीभाव खरेदी केंद्राची मागणी केल्याने ते मंजुर झाले आहे. त्यासाठी शेतक-यांनी खरेदी केंद्रावर मुदतीत नाव नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार आणि उपसभापती निलेश लडकत यांनी केले आहे.   
मका खरेदी केंद्रावर शेतक-यांनी नाव नोंदणी साठी मका पिकाची नोंद असलेल्या ७/१२ उतारा, (पिकपेरा) आधारकार्डची छायांकित प्रत व  चालु असलेले बॅक खाते अचुक तपशिलासह झेरॉक्स, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे तसेच एका पेक्षा जास्त बँक खाते करिता एकाच       शेतक-यांची नोंद असु नये. तरी मका उत्पादक शेतक-यांनी निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक बारामती येथे प्रथम ऑनलाईन नाव नोंदणी करावी. खरेदी सुरू झाले नंतर नोंदणी झालेल्या शेतक-यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मका खरेदी केंद्रावर आणण्यासाठी नंबर नुसार एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार शेतक-यांनी बारामती बाजार समितीचे यांत्रिक चाळणी येथील खरेदी केंद्रावर मका स्वच्छ व वाळवुन आणावा असे आवाहन बाजार समिती तर्फे करणेत येत आहे. मकेचा हमीभाव दर प्रति क्विंटल रू. २०९०/- आहे. ज्या शेतक-यांची नाव नोंदणी होईल त्यांच शेतक-यांची मका खरेदी करणार असलेने शेतक-यांना नोंदणी बंधनकारक आहे अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

No comments:

Post a Comment