श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर गळीत हंगाम *२०२३-२४* चा ५१ वा बॉयलर अग्नी प्रदिपन शुभारंभ संपन्न झाला... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 16, 2023

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर गळीत हंगाम *२०२३-२४* चा ५१ वा बॉयलर अग्नी प्रदिपन शुभारंभ संपन्न झाला...

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर गळीत हंगाम *२०२३-२४* चा ५१ वा बॉयलर अग्नी प्रदिपन शुभारंभ संपन्न झाला...
अकलूज(प्रतिनिधी):-श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर गळीत हंगाम *२०२३-२४* चा ५१ वा बॉयलर अग्नी प्रदिपन शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील व मा. सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे संचालक श्री. सुनील माने व सौ. सविता सुनील माने यांच्या शुभहस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. मदनसिंह मोहिते पाटील, श्री शंकर सहकारी चे चेअरमन तथा विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, विधानसभा आमदार मा. श्री. रामभाऊ सातपुते, व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील, (बॉयलर डिझायनर )शशी गरड तसेच कारखान्याचे संचालक संजय कोरटकर, रामदास कर्णे, दत्तात्रय रणवरे, चंद्रकांत शिंदे, शिवाजी गोरे, नंदन दाते, भगवान मिसाळ, दत्तात्रय चव्हाण, धोंडीराम नाळे, अर्जुन धाईंजे, सुधाकर पोळ, रमेश जगताप, सौ.अलका पाटील, सौ.देवयानी सालगुडे पाटील, अनंतलाल दोशी, पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते, प्रताप सालगुडे पाटील, शिवामृत दूध संघांचे संचालक अरविंद भोसले, सरपंच शिवाजी जाधव, देविदास ढोपे, विरकुमार दोशी, उपसरपंच उदय धाइंजे, दादा पाटील, शिवराज निंबाळकर, तुकाराम चव्हाण, लालखन पठाण, भोजराज माने, संतोष शिंदे, एकनाथ वाघमोडे, अंकुश डुबल,कारखान्याचे एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख , कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप,खातेप्रमुख, विभागप्रमुख आदी मान्यवर तसेच सभासद शेतकरी,ऊस उत्पादक,  तोडणी वाहतूक कंत्राटदार, कामगार  व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment