धक्कादायक.. बलात्काराच्या 97 टक्के घटनांमध्ये आरोपी असतो ओळखीचा;याअहवालातून माहिती आली पुढे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 19, 2023

धक्कादायक.. बलात्काराच्या 97 टक्के घटनांमध्ये आरोपी असतो ओळखीचा;याअहवालातून माहिती आली पुढे..

धक्कादायक.. बलात्काराच्या 97 टक्के घटनांमध्ये आरोपी असतो ओळखीचा;या
अहवालातून माहिती आली पुढे..
मुंबई:- नुकताच एक माहिती पुढे आली या माहितीनुसार बलात्कार च्या घटनांमध्ये आरोपी ओळखीचाच शक्यतो असतो याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, महिला, मुलींसाठी मुंबई असुरक्षित असल्याची घटना घडत असताना नुकताच मुंबईत एक घटना घडली आहे.
एका महाविद्यालयीन तरुणीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी दोन जणांना अटकसुद्धा केली आहे. या घटनेतील आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे असल्याची माहिती समोर आली आहे. तर एनसीआरबीच्या एका अहवालातून बलात्काराच्या एकुण घटनांपैकी 97 टक्के घटनांमधील आरोपी हे पीडितेच्या परिचयातीलच
असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे,
मुंबईत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून,न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. असे असतानाच
भारतात बलात्काराच्या घटनांमधील आरोपी हे पीडितेच्या परिचयातीलच असल्याची माहिती समोर येत आहे.हे आकडे काय सांगतात?
राष्ट्रीय क्राइम रिकॉर्ड ब्यूरोच्या 2022 च्या
आकडेवारीनुसार 97 टक्के प्रकरणात आरोपी हा
पीडितेच्या परिचयातीलच असल्याची माहिती आहे. तर 2021 मध्ये 31 हजार 677 प्रकरणापैकी 30 हजार 571 प्रकरणात आरोपी हे पीडितेच्या परिचयातीलच होता. याच प्रकरणातील 15 हजार 196 प्रकरणातील आरोपी हे मित्र,शेजारी किंवा नातेवाईक आहेत. यातून हे सिद्ध होते की, महिलांना त्यांना अपरिचित व्यक्तींपेक्षा त्यांच्या परिचित असलेल्यांपासूनच अधिक धोका आहे. कारण ते त्यांच्याशी सावधगिरी बाळगत नाहीत. असेच एक प्रकरण मुंबईतील चेंबूरमध्ये समोर आले आहे. देशातील प्रतिष्ठित संस्था भाभा अणु संशोधन केंद्राच्या कॅम्पसमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.तर एका तासाला घडतात तीन बलात्कार
महाराष्ट्रसह देशात महिला, मुली सुरक्षित नसल्याची धक्कादायक माहिती एनसीआरबीच्या अहवालातून समोर आहे. कारण, घडलेल्या बलात्काराच्या घटनांच्या आकडेवारीचा विचार केला तर देशात दर तासाला तीन महिलांवर बलात्कारासारखी घृणास्पद घटना घडते. 2021
मध्ये महिलांविरोधातील 4.28 लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानुसार दररोज 1173 प्रकरणे समोर आली. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये 15 टक्क्यांहून अधिक महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याचवेळी,लहान मुलांविरोधातील 1.49 लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2020 च्या तुलनेत ही संख्या 16 टक्क्यांहून अधिक आहे. अपहरण आणि पॉक्सो कायद्यांतर्गत मुलांवरील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी बलात्काराचे 31 हजार 677 गुन्हे दाखल झाले आहेत. अशाप्रकारे दर तासाला तीन महिलांवर बलात्कार होत असल्याने महिला आणि मुलींच्या
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Post a Comment