दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने वापरलेल्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह गुन्हेगारांना अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 11, 2023

दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने वापरलेल्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह गुन्हेगारांना अटक..

दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने वापरलेल्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह गुन्हेगारांना अटक..
वालचंदनगर:- दिनांक ०६.११.२०२३ रोजी मौजे काझड गावचे ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार राहुल चांगदेव नरूटे व समीर मल्हारी नरूटे यांनी पराभव सहन न झाल्याने काझड गावचे वामन चौकात त्यांचेकडील सेलेरीओ कार नं एम एच ४२ बी. बी. २४५० मधुन येवुन गावात दहशत निर्माण करण्याच्या उददेशाने त्याचे जवळील पिस्टल मधुन हवेत गोळीबार करून तेथील लोकांना शिवीगाळ करून कार मधुन निघुन गेले दरम्यान आरोपींचा शोध घेत असताना वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गणेश काटकर यांना आरोपी त्यांचेकडील कारने अकोले बाजुने काझड कडे येत असलेबाबत माहीती मिळाल्याने पोलीस हवालदार काटकर अकोले-काझड रोडला उभे असताना आरोपींनी त्यांचेकडील कार भरधाव वेगात चालवित घेवुन येत असताना पोलीस हवालदार काटकर यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी पोलीस हवालदार काटकर यांचे अंगावर त्यांना ठार मारण्याच्या उददेशाने कार घातली परंतु ते बाजुला सरकलेने त्यांचा जीव वाचला त्यावेळी वालचंदनगर चे पोलीस पो.हवा शैलेश स्वामी, पो. हवा. गुलाब पाटील आरोपींचा पाठलाग करीत असताना वायसेवाडी येथे एका रानात त्यांची कार सोडुन ते पळुन गेले, घटनेचे गांभीर्य ओळखून वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि साळुंखे यांनी पोसइ खंदारे व पोलीस स्टाफसह आरोपींचा शोध घेत असताना त्याचे ठावठिकाणाबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेउन गुन्हयातील आरोपी नामे राहुल चांगदेव नरूटे व समीर मल्हारी नरूटे दोन्ही रा. काझड ता इंदापुर जि पुणे यांना सापळा रचुन त्यास शिताफीने व सावधपणे पकडण्यात आले, तपासादरम्यान आरोपींनी वापरलेली सेलेरीओ कार नं एम एच ४२ बी.बी. २४५० व एक पिस्टल व त्यामध्ये एक जिवंत राउंड असा एकुण ७ लाख रूपयाचा माल जप्त करणेत आला आहे. सदरबाबत वालचंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी श्री अंकित गोयल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, बारामती विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि विक्रम साळुंखे, पोसई अतुल खंदारे तसेच पो हवा गुलाबराव पाटील, पो. हवा शैलेश स्वामी, पो.हवा. गणेश काटकर, पो हवा विनोद पवार, पो हवा. परिमल मानेर पो. हवा. बापु मोहीते पोलीस नाईक सतिश फुलारे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत कळसकर पोलीस कॉन्स्टेबल किसन बेलदार, तसेच पोलीस मित्र हमीद शेख यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोसई अतुल खंदारे करीत आहेत.

No comments:

Post a Comment