*दुधाला शासनाने ठरवुन दिलेला हमीभाव मिळण्याबाबत बारामती येथे संभाजी ब्रिगेड आक्रमक* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 28, 2023

*दुधाला शासनाने ठरवुन दिलेला हमीभाव मिळण्याबाबत बारामती येथे संभाजी ब्रिगेड आक्रमक*

*दुधाला शासनाने ठरवुन दिलेला हमीभाव मिळण्याबाबत बारामती येथे संभाजी ब्रिगेड आक्रमक*
बारामती:- या वर्षी राज्यात बहुतांश ठीकणी पाऊस कमी झाला आहे त्यामूळे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांना चारा विकत घेऊन घालावा लागत आहे.

शेतकरी दुग्धव्यवसायिक अश्या अतिशय हलाकीच्या परिस्थिती मध्ये दूध व्यवसाय करत आहेत. त्यामध्ये सध्या दुधाचे दर प्रति लिटर ३६/- रु वरून २६/- प्रति लिटर इतका कमी झाला आहे. ३ महिन्यापूर्वी मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब (महसूल, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी दुधाला ३४/- रु. हमीभाव देणे तसेच पशु खाद्याच्या किंमती कमी करण्याच्या संदर्भात अध्यादेश जारी केला होता,परंतु सध्या दुध दर २६/- रु. पर्यंत खाली पाडले आहेत. 

तसेच पशुखाद्य कंपन्यांनी खाद्याचे भाव कमी करण्याऐवजी भाव प्रति बॅग ला ५०/- ते १००/- रुपयाने वाढवले आहे,त्यामुळे दुग्ध व्यवसायात प्रचंड तोटा सहन
करावा लागत आहे,

आपला अन्नदाता शेतकरी आनंदाने जगला पाहिजे यासाठी शेतकरी हितासाठी संभाजी ब्रिगेड खालिल महत्वपूर्ण शासन दरबारी मांडल्या .
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या :- 
१) दुधाला ४०/- रु प्रति लिटर हमीभाव मिळावा.
२) पशु खाद्याच्या किंमती ५०% कमी केल्या पाहिजेत.
३) पशु औषधं GST तुन मुक्त करण्यात यावी.
४) महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षात अन्न भेसळ प्रतिबंधक पथकांनी किती कारवाया केल्या व किती भेसळखोर आरोपीना शिक्षा किंवा दंड ठोठवला याची श्वेतपत्रिका काढावी.
५) सर्व खाजगी व सहकारी प्लॅट चालक यांचे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दरमहा ऑडीट घ्यावे व कोणाचे संकलन किती आहे व दुध पिशवी विक्री किती आहे, बायपॉडक्ट किती आहे याची दरमहा माहिती सार्वजनिक जाहिर करण्यात यावी.
६) महाराष्ट्रातील सर्व खासगी व सहकारी प्लॅट चालक व अक्षभेसळ प्रतिबंध पथकातील अधिकारी यांची ED चौकशी करण्यात यावी.
७) ज्या खाजगी व सहकारी दूध संघ चालकानी गेल्या ३ महिन्यापासून शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव दिला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
८) पशुखाद्य किंवा पशु औषध यांची गुणवत्तेनुसार किमान व कमाल आधारभूत किंमत ठरविण्यात यावी. 
९) शासनान ठरवून दिलेल्या हमीभाव आणी आत्ताचा दर यामधला फरक शेतकरी यांना मिळावा.
१०) फॅट / SNF फरक पूर्वीप्रमाणे ०.२० पैसे कमी जास्त करावा.
११) दुध पावडरला अनुदान द्यावे.

सरकारने या वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड दुध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेवून बारामती प्रशासकीय कार्यालय समोर तीव्र आंदोलन करेल याचे मागणी पत्र दिनांक २८/११/२३ रोजी शिवश्री प्रशांत पवार (अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड) ,शिवश्री तुषार तुपे(अध्यक्ष बारामती तालुका संभाजी ब्रिगेड),शिवश्री कांतीलाल काळकुटे(अध्यक्ष, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी),शिवश्री दत्तात्रय जाधव(अध्यक्ष बारामती तालुका  संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी), शिवश्री अस्लम रज्जाक तांबोळी (अध्यक्ष बारामती शहर संभाजी ब्रिगेड) व ईतर पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये बारामतीचे तहसीलदार श्री गणेश शिंदे यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment