धनगर आंदोलनाला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट;उपोषण मागे घेण्यास केली विनंती मात्र उपोषणकर्ते ठाम....
बारामती:- बारामतीत गेली सात दिवसापासून धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांना पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत असून गावातून रॅली काढून पाठिंबा देण्यात आला प्रशासन भवन, बारामती समोर चालू असलेल्या उपोषणाला धनगर आरक्षणासाठी प्रशासकीय भवन बारामती येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला महिलांचा भाऊबीज करुन पाठिंबा देण्यात आला,उपोषण कर्त्याची दखल तात्काळ न घेतल्यास उद्या दि.16/11/2023 ला बारामती बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता यावेळी पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख व पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी चर्चा करून आम्ही शासनाच्या वतीने आलो आहोत आपण उपोषण सोडावे अशी विनंती
करण्यात आली यावेळी बऱ्याच वेळ समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे हे आपल्या भूमिकेवर ठाम होते,त्यांनी हात जोडून जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना विनंती केली की मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, जो पर्यंत मुख्यमंत्री धनगर आरक्षणावर निर्णय घेत नाही व त्यांनी अथवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा होत नाही तोपर्यंत चालू असलेले आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment