बसपाची बारामती शहर आणि तालुका कार्यकारणी जाहीर..
बारामती/प्रतिनिधी:- बहुजन समाज पक्षाची बारामती शहर आणि तालुक्याची बैठक बसपाचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी चौधरी यांनी बसपाच्या बारामती शहर आणि तालुक्यातील कार्यकारिणीची निवड केली.
त्यामधे बसपाच्या पुणे जिल्हा सचिव पदी चंद्रकांत खरात,बारामती विधानसभा प्रभारी पदी इसाक पठाण,दयानंद पिसाळ,विधानसभा अध्यक्ष पदी विशाल घोरपडे,उपाध्यक्ष पदी बाळासाहेब पवार,महासचिव पदी दादा टेकाळे,सचिव पदी रोहित जगताप,चेतन लोंढे,कोषाध्यक्ष पदी अक्षय अनपट,बीव्हीएफ संयोजक सुनिल चव्हाण,बामसेफ संयोजक शैलेश सोनवणे,अक्षय माने यांची निवड करण्यात आली आहे.तर बारामती शहराध्यक्ष पदी प्रफुल्ल वाघमारे,उपाध्यक्ष पदी प्रफुल्ल राठोड,महासचिव पदी मयूर केंगार,सचिव पदी राहुल काळे,कोषाध्यक्ष पदी अजय माने तर युवक अध्यक्ष लखन मिसाळ यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान,सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांनी अभिनंदन करून बारामती शहर आणि तालुक्यातील तळागातील लोकांपर्यंत बसपाची आणि महापुरुषांची विचारधारा पोहचवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या सूचना चौधरी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिल्या.
No comments:
Post a Comment