*पुणे पोस्ट विभागातर्फे " दिवाळी फराळ परदेशात या उपक्रमात उत्तम काम करण्याऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान.* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 30, 2023

*पुणे पोस्ट विभागातर्फे " दिवाळी फराळ परदेशात या उपक्रमात उत्तम काम करण्याऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान.*

*पुणे पोस्ट विभागातर्फे " दिवाळी फराळ परदेशात या उपक्रमात उत्तम काम करण्याऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान.*
पुणे:-पुणे पोस्ट विभागाने दिवाळी निमित्त, परदेशात असलेल्या आपल्या प्रियजनांना फराळ पाठवता यावे यासाठी " दिवाळी फराळ परदेशात" हा उपक्रम २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबवला होता.
त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद पुणे शहरातील नागरिकांकडून मिळाला. पुणे शहरातील पोस्ट ऑफिसेस मधून जवळ जवळ ७५०० किलो फराळ  चे पार्सल महिनाभरात अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान,सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा तसेच इतर देशात पाठवण्यात आले.

या उपक्रमात पोस्टमन मार्फत घरून pickup तसेच पॅकेजिंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

या कालावधीमध्ये उत्तम काम करणाऱ्या पोस्ट office मधील कर्मचाऱ्याचा गुणगौरव सोहळा काल पर्वती पोस्ट office मध्ये पार पडला. या सोहळ्याला पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल श्री रामचंद्र जायभाये, डाक संचालिका सिमरन कौर, श्री आर पी गुप्ता ( Professor, Gokhale Institute), पुणे शहर पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉक्टर अभिजित इचके, पुणे शहर पश्चिम विभागाच्या अधीक्षक  श्रीमती रिपन दुल्लेत, पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बाळकृष्ण एरंडे व पोस्टाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना पुणे क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांनी सर्व गुणवंत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व भविष्यात अशीच जनतेची सेवा करायचे आवाहन केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा प्रचार प्रसार अजूनही पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही, तो वाढवण्याची गरज व्यक्त केली. पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचे दर बाकीच्या कुरिअर च्या तुलनेत स्वस्त आहेत त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पोस्टमन डाक पोस्ट विभागाचा कणा आहे व यामधे पोस्टमन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तसेच जनते पर्यंत ही माहिती पोहूचु शकतात असेही सांगितले.


पुणे क्षेत्राच्या डाक संचालिका सिमरन कौर यांनी सुद्धा गुणवंत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की येणाऱ्या भविष्यकाळात डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार e commerce क्षेत्रामुळे होणार आहे,त्यामधे पोस्ट ऑफिसेस ची महत्वपूर्ण भूमिका असली पाहिजे कारण पोस्ट ऑफिस चे सर्वात मोठे नेटवर्क आहे व देशातल्या काना कोपऱ्यात पोस्ट ऑफिस मधून पार्सल बुकिंग तसेच डिलिव्हरी होऊ शकतात.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री नागेश डुकरे उप प्रबंधक (व्यवसाय विकास) यांनी केले व आभार प्रदर्शन श्री शरद वांगकर, सहाय्यक अधीक्षक पुणे क्षेत्रीय कार्यालय यांनी केले.

No comments:

Post a Comment