धक्कादायक..दारू धंद्यावर कारवाई दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण;शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 24, 2023

धक्कादायक..दारू धंद्यावर कारवाई दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण;शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड..

धक्कादायक..दारू धंद्यावर कारवाई दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण;शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड..
माळेगाव:- बारामती तालुक्यातील या गावांमध्ये अवैध दारू होत असल्याचे पुन्हा एखादा उघडकीस आले आहे यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनावर संशयाची पाल चुकचुकत असल्याचे यादरम्यान घडलेल्या घटनेवरून चर्चा रंगताना दिसत आहे, नेहमीच वादात असलेले माळेगाव हे पुन्हा एखादा चर्चेत आले, वेळीच कारवाई झाली असती तर अशी घटना घडली नसते अशीही चर्चा होताना दिसत आहे, राजरोसपणे चालू असणारे अवैध दारू, मटका, खुलेआम विकला जाणारा गुटखा यावर कारवाई होण्यास का विलंब होत होता असे स्थानिक रहिवासी बोलताना दिसत आहे.नव्याने उभारलेले पोलीस स्टेशन कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी अश्या अवैध धंद्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी असूनही दुर्लक्ष केले गेले असल्याचे बोलले जात आहे, याचा परिणाम राज्य उत्पादन शुल्क विभागाला भोगावा लागला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बारामती
तालुक्यातील माळेगाव येथे अवैध दारूच्या
अड्डय़ावर छापा मारण्यासाठी गेलेल्या दौंड व
बारामतीच्या उत्पादन शुल्क विभागाच्या
अधिकाऱ्यांना लाकडी काठी व दगडाने
मारहाण केली. तसेच शासकीय व खाजगी
वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक
घटना समोर आली आहे. गुरुवार (दि. २३)
रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास  माळेगाव हद्दीत विक्रमनगर येथे आरोपी यांच्या
राहते घरासमोर हा प्रकार घडला. तर
मारहाणीत जखमी अधिकारी बारामतीत रुग्णालयात उपचार घेत आहेत.गुरुवारी
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हे अधिकारी
अवैध दारूच्या अड्डय़ावर छापा मारायला गेले
होते. दरम्यान जमावाकडून अधिकाऱ्यांना
काठी व दगडाने बेदम मारहाण झाल्याने
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन खळबळ उडाली आहे. तर रात्री साडे
अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या
धक्कादायक प्रकारामुळे उलट सुलट चर्चांना
उधाण आले आहे, या मारहाणीत उत्पादन शुल्क विभागाचे
शासकीय वाहनांवर दगडफेक करून नुकसान
करण्यात आले आहे. फिर्यादी विजय वसंतराव
रोकडे (वय ५५), यांनी आरोपी किशोर
जनार्धन धनगर, पिंटु गव्हाणे व अनोळखी ८
ते १० इसम सर्व रा. विक्रमनगर माळेगाव, ता.
बारामती, जि. पुणे. यांच्या विरोधात
सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनीयमानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या
मारहाणीत सरकारी वाहन (क्र. एमएच
१२टीके ९६९२), व खाजगी वाहन (क्र.
एमएच १४ केएफ८०८०) या वाहनांचे
नुकसान झाले आहे.
तसेच मारहाणीत फिर्यादीसह गणेश बाबुराव
नागरगोजे (वय ३३), राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक दौंड, सुभाष लक्ष्मण मांजरे
(वय ५६), राज्य उत्पादन शुल्क दुय्यम
निरीक्षक दौंड, प्रविण रामचंद्र सुर्यवंशी (वय
४३) राज्य उत्पादन जवान दौंण्ड, अशोक
काशीनाथ पाटील (वय ५०), राज्य उत्पादन
शुल्क जवान दौंड, सागर रामचंद्र सोनवले
(वय ४०), रा . मळद ता बारामती जि पुणे. हे
जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात
आले आहे. यातील फिर्यादी हे त्यांच्या स्टाफ व पंचासह
शासकीय काम करीत असताना यातील
आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवून
हातातील काठीने व दगडाने मारहान करुन
शिवीगाळी केली. तसेच शासकीय कामात
अडथळा निर्माण करुन शासकीय व खाजगी
वाहनांना दगड मारुन काचा फोडण्यात आल्या
आहेत. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे
पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे हे अधिक तपास करीत आहेत.राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा मारायला गेले अन् मार खाऊन आले तर दुसरीकडे या महिलांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत काही महिला बोलताना रात्रीच्या सुमारास येऊन कारवाईच्या नावाखाली मारहाण केल्याचे सांगितले याबाबत तपासात काही गोष्टी उघडकीस येतील पण काल ट्राय डे असताना बारामती शहरात उघडपणे बंद देशीदारू,वाइन शॉपी  दुकानाच्या आड बाजूला लहान अल्पवयीन मुलाकडून दारू विक्री करताना राजरोस पणे पहावयास मिळत होते यावर मात्र कारवाई का?केली गेली नाही असा संतप्त सवाल विचारला जात आहे.यामुळे बारामती विकसित होत असताना अवैध दारू विक्री होत असल्याचे पुन्हा एखादा सिद्ध झाले आहे.

No comments:

Post a Comment